Xiaomi नं आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची किंमत कायमस्वरूपी कमी केली आहे. Redmi Note 10S स्मार्टफोनच्या किंमतीत 2000 रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. हा फोन गेल्यवर्धी MediaTek Helio G95 प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी, 64MP कॅमेरा सेटअप आणि 33W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला होता. चला जाणून घेऊया नवी किंमत.
मॉडेल | लाँच किंमत | नवीन किंमत | कपात |
---|---|---|---|
Redmi Note 10S 6GB/64GB | 14,999 रुपये | 12,999 रुपये | 2,000 रुपये |
Redmi Note 10S 6GB/128GB | 15,999 रुपये | 14,999 रुपये | 1,000 रुपये |
Redmi Note 10S 8GB/128GB | 17,499 रुपये | 16,499 रुपये | 1,000 रुपये |
Redmi Note 10S चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी नोट 10 एसमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये हाय रिफ्रेश रेट देण्यात आलेला नाही. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी 95 चिपसेट देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये 6GB/8GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
रेडमी नोट 10एसमध्ये कॅमेरा सेटअप हा 64 मेगापिक्सल प्रायमरी आणि 8 मेगापिक्सल सेकंडरी असा आहे. याला अल्ट्रा वाईड अँगल आहे. सोबतच अन्य कॅमेरे हे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. रिअर कॅमेराने 4K 30fps व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात. या फोनला 13 मेगा पिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. Redmi note 10S मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 33 वॉटचा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.