रेडमी इंडियाने कोरोना संकटात भारतात रेडमी नोट 10 एस लाँच (Redmi Note 10S) केला आहे. याचबरोबर कंपनीने भारतात पहिल्यांदाच स्मार्ट वॉचदेखील लाँच (Redmi Watch) केले आहे. रेडमी नोट 10एस हा रेडमी नोट 10 सीरीजचा चौथा स्मार्टफोन आहे, या आधी रेडमीने या सीरीजचे तीन फोन मार्चमध्ये लाँच केले होते. रेडमी नोट 10 एसमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या फोनची खासियत.... (Redmi Note 10S With MediaTek Helio G95 SoC, Redmi Watch With 11 Sports Modes Launched in India)
Xiaomi ने केले iPhone वरून ट्विट, बिल-मेलिंडा घटस्फोटाच्या आधारे केली जाहिरात, मग जे झाले...
Redmi Note 10S specificationsरेडमी नोट 10 एसमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये हाय रिफ्रेश रेट देण्यात आलेला नाही. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आली आहे. या फोनचे बॅक पॅनेल प्लॅस्टिकचे आहे, परंतू हा फोन दिसायला रेडमी नोट 10 सीरीज सारखाच आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी 95 चिपसेट देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये 6GB/8GB रॅम ( किंमत 14,999 रुपये) आणि 64GB/128GB स्टोरेज (किंमत 15,999 रुपये) देण्यात आले आहे. यामध्ये यूएफएस 2.2 स्टोरेज आहे.
Redmi Note 10S cameraरेडमी नोट 10एसमध्ये कॅमेरा सेटअप हा 64 मेगापिक्सल प्रायमरी आणि 8 मेगापिक्सल सेकंडरी असा आहे. याला अल्ट्रा वाईड अँगल आहे. सोबतच अन्य कॅमेरे हे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. रिअर कॅमेराने 4K 30fps व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात. या फोनला 13 मेगा पिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.
Redmi Note 10S battery fast chargingRedmi note 10S मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 33 वॉटचा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.
Redmi Watch रेडमीने भारतातील पहिले स्मार्टवॉच लाँच केले आहे. 11 स्पोर्ट मोड, 24/7 हार्ट रेट ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग, इन-बिल्ट जीपीएस, 5ATM वॉटर रेजिस्टेंस अशी फिचर आहेत. Redmi Watch मध्ये 1.4 इंच TFT LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. PPG हार्ट रेट सेंसर, थ्री-एक्सिस एक्सेलेरेशन सेंसर, जियोमैग्नेटिक सेंसर, बैरोमीटर, गायरोस्कोप आणि एक एम्बिएंट लाइट सेंसर देण्यात आला आहे. दोन तासांत एकदा पूर्ण चार्ज झाले की 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.