Xiaomi नं भारतात Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus 5G लाँच केला आहे. Redmi Note 11 Pro Plus 5G स्मार्टफोन देशात 108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 8GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 67W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे. चला जाणून घ्या या फोनचे स्पेसिफिकेशन्स, फिचर्स आणि किंमत.
Redmi Note 11 Pro Plus 5G स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डॉट नॉच डिजाईनसह आलेला डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 13 वर चालतो. कंपनीनं यात Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेट देण्यात आला आहे. या फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल.
Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 67W का फास्ट चार्जर देण्यात आला आहे.
Redmi Note 11 Pro Plus 5G ची किंमत
Redmi Note 11 Pro Plus 5G स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतात आले आहेत. या स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. तर तिसरा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन 15 मार्चपासून विकत घेता येईल.
हे देखील वाचा: