शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
3
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
4
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
6
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
7
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
8
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
9
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
10
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
11
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
12
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
13
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
14
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
15
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
16
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
17
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
18
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
19
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
20
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण

Redmi Note 11 Launch: Redmi Note 11 5G, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ दमदार स्पेसिफिकेशन्ससह लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: October 28, 2021 7:32 PM

Xiaomi Redmi Note 11 Series Price Launch Details: Xiaomi ने आपल्या बहुप्रतीक्षित रेडमी नोट 11 सीरिजमध्ये Redmi Note 11 5G, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus असे तीन दमदार फोन सादर केले आहेत. ज्यात 108MP Camera, 120W Fast Charging आणि 8GB RAM असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स मिळतात.  

शाओमीने होम मार्केट चीनमध्ये Redmi Note 11 series लाँच केली आहे. या बहुप्रतीक्षित सीरिज अंतर्गत Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ असे तीन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. यातील Redmi Note 11 Pro+ सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे, जो 120W Max फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. चला जाणून घेऊया Xiaomi Redmi Note 11 series ची सविस्तर माहिती.  

Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स 

Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ या दोन्ही फोन्सचे बहुतांश स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. फक्त Redmi Note 11 Pro+ मधील 4500mAh ची बॅटरी 120W fast charging सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. तर Redmi Note 11 Pro मधील 5000mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही फोन्समध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि पंच होल डिजाईनसह आला आहे. दोन्ही रेडमी फोन्समध्ये ऑक्टकोर मीडियाटेक डिमेंसीटी 920 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. 

फोटोग्राफीसाठी Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. दोन्ही फोन्समध्ये ड्युअल सिमेट्रिक JBL-ट्यून स्टिरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. जे डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि हाय-रेज ऑडिओला सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी या फोन्समध्ये NFC, GPS, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक मिळतो. हे दोन्ही फोन IP53 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह सादर झाले आहेत. तसेच यात VC लिक्विड कुलिंग देण्यात आली आहे.  

Redmi Note 11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स 

Redmi Note 11 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. रेडमी नोट 11 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

Xiaomi Redmi Note 11 Series Price (किंमत)  

  • Redmi Note 11 Pro+ 6GB/128GB: 1,899 CNY (अंदाजे 22,200 रुपये) 
  • Redmi Note 11 Pro+ 8GB/128GB: 2,099 CNY (अंदाजे 24,600 रुपये)  
  • Redmi Note 11 Pro+ 8GB/256GB: 2,299 CNY (अंदाजे 26,900 रुपये)  
  • Redmi Note 11 Pro 6GB/128GB: 1,599 CNY (अंदाजे 18,700 रुपये)  
  • Redmi Note 11 Pro 8GB/128GB: 1,899 CNY (अंदाजे 22.200 रुपये)  
  • Redmi Note 11 Pro 8GB/256GB: 2,099 CNY (अंदाजे 24,600 रुपये)  
  • Redmi Note 11 4GB/128GB: 1199 CNY (अंदाजे 14,000 रुपये)  
  • Redmi Note 11 6GB/128GB: 1299 CNY (अंदाजे 15,200 रुपये) 
  • Redmi Note 11 8GB/128GB: 1499 CNY (अंदाजे 17,500 रुपये)  
  • Redmi Note 11 8GB/256GB: 1699 CNY (अंदाजे 19,800 रुपये) 
टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान