Redmi Note 11T 5G India Launch: चीनमध्ये आलेली रेडमी नोट 11 सीरीज भारतात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार उद्या म्हणजे 30 नोव्हेंबरला Redmi Note 11T 5G Phone लाँच केला जाणार आहे. हा लाँच इव्हेंट दुपारी 12 वाजता सुरु होईल आणि हा इव्हेंट कंपनीच्या युट्युब चॅनेलवरून लाईव्ह बघता येईल. लाँच होण्याआधी कंपनीनं या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग, 90Hz रिफ्रेश रेट आणि 6nm चा प्रोसेसर असेल असे सांगितले होते.
Redmi Note 11T 5G Price In India
मीडिया रिपोर्ट्सनुसार Redmi Note 11T 5G स्मार्टफोन भारतात 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. ही 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत असू शकते. या मोबाईलचे 6GB/128GB आणि 8GB/128GB स्टोरेज व्हेरिएंट अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपयांमध्ये सादर केले जाऊ शकतात. ही संभाव्य किंमत आहे, खरी किंमत उद्या लाँचनंतरच समोर येईल.
Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. जो 2.4Ghz क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल.
रेडमी नोट 11टी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.