रेडमीची नोट लाईनअप खूप लोकप्रिय आहे. मिडरेंजमध्ये येत असल्यामुळे अनेक ग्राहक या सीरिजची वाट बघत असतात. गेल्या काही वर्षांपासून कंपनी वर्षातून दोन रेडमी नोट लाईनअप सादर करत आहे. आता Redmi Note 12 Series च्या लाँचची तयारी सुरु आहे. ऑनलाईन मिळालेल्या लिक्सनुसार ही स्मार्टफोन सीरीज 2022 च्या उत्तरार्धात सादर केली जाईल. त्यामुळे पुढील काही आठवड्यात ही सीरिज सर्वप्रथम चीनमध्ये आणि नंतर भारतासह जगभरात सादर केली जाऊ शकते.
Redmi Note 12 Series
यंदाही रेडमीच्या नव्या नवीन नोट लाईनअपमध्ये कमीत कमी तीन मॉडेल असे शकतात. ज्यात स्टॅंडर्ड, प्रो आणि प्रो मॅक्स व्हर्जनचा समावेश असू शकतो. रेडमीच्या या मिड-रेंज स्मार्टफोन सीरीजमध्ये एक इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असेल, जो टॉप-सेंटरमध्ये असेल. रेडमी नोट 11 लाईनअप सारखाच सेल्फी कॅमेरा देण्यात आईला. टिप्सटरनं सांगितले की, फोनमध्ये एक फ्लॅट स्क्रीन मिळेल आणि मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.
डिवाइसमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा असेल, सोबत अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि एक मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. बातमीमध्ये या डिवाइसच्या लेन्स लेआउट जास्त बदलली जाणार नाही, असं सांगण्यात आलं आहे. फ्लॅश देखील हॉरिजॉन्टल असेल.
Redmi Note 12 Series बाबत आतापर्यंत मिळेलल्या माहितीवरून वाटत आहे की, सीरिजची डिजाईन नोट 11 सीरीज सारखी असेल. फक्त कंपनी या नवीन लाईनअपमध्ये आधीपेक्षा जास्त चांगला प्रोसेसर देखील, अशी अपेक्षा आहे. Redmi Note 12 Series मध्ये 45000mAh या 5000mAh बॅटरी मिळू शकते. तसेच फास्ट चार्जिंग पाहता, यात 33W किंवा त्यापेक्षा जास्त स्पीड मिळू शकतो.