Xiaomi नं भारतात आज अनेक गॅजेट्स सादर केले आहेत. यात स्मार्टफोन आणि फिट बँडसह Smart TV चा देखील समावेश आहे. कंपनीनं Redmi Smart TV X43 मिड बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. यात 4K डिस्प्ले, 30W स्पीकर आणि Android TV 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. चला जाणून घेयला या स्मार्ट टीव्हीची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
Redmi Smart TV X43 चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी स्मार्ट टीव्ही एक्स43 हा सीरिजमधील सर्वात छोटा टीव्ही आहे. ज्यात 43 इंचाचा 4K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्लिम बेजल डिजाईन येणारा नवीन रेडमी स्मार्ट टीव्ही HDR ला देखील सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड टीव्ही 10 ओएस आधारित पॅचवॉल 4 युआय देण्यात आला आहे. यात मुव्ही रेटिंगसाठी IMDB इंटीग्रेटेड आहे. तसेच यात 15 पेक्षा जास्त भाषांमध्ये 30 पेक्षा जास्त कंटेंट पार्टनर्स देखील या टीव्हीशी जोडण्यात आले आहेत.
या व्हर्च्युअल एक्स आणि डॉल्बी एटमॉसला सपोर्टसह 30W चे स्पिकर देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये तीन HDMI 2.1 स्लॉट, दोन USB पोर्ट, एक ईथरनेट पोर्ट, एक ऑप्टिकल आणि 3.5 मिमी जॅकचा समावेश. यात गेमर्ससाठी खास गेमिंग मोड मिळतो ज्यात 4K 60fps वर 5ms ची लेटन्सी मिळते.
किंमत
रेडमी स्मार्ट टीव्ही एक्स43 ची किंमत 28,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा टीव्ही 16 फेब्रुवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हा टीव्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. तसेच Redmi Smart TV X43 ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर देखील खरेदीसाठी उपलब्ध होईल.
हे देखील वाचा: