Xiaomi च्या रेडमी लाईनअप मधील एक स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन एका लीकस्टरने लीक केले आहेत. या स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा मात्र त्याला करता आला नाही. लीक स्पेसिफिकेशननुसार हा फोन Snapdragon 870 चिपसेटसह बाजारात येईल. तसेच या फोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह दिला जाईल. तसेच या फोनमध्ये 50MP चा रियर कॅमेरा देखील मिळू शकतो.
विशेष म्हणजे यावर्षीच्या सुरवातीला कंपनीने Redmi K40 स्मार्टफोन सादर केला होता. या फोनमध्ये Snapdragon 870 SoC मिळू शकते. हाच रेडमी फोन भारतात Mi 11X नावाने सादर करण्यात आला होता. आता लीक झालेला रेडमी फोन Redmi K40 आणि Mi 11X ची जागा घेईल. प्रसिद्ध टिपस्टर Digital Chat Station ने Snapdragon 870 असलेल्या आगामी रेडमी फोनची माहिती दिली आहे. हा फोन Redmi K50 नावाने बाजारात दाखल केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.
आगामी Redmi Phone
शाओमी एका नवीन प्रीमियम Redmi स्मार्टफोनवर काम करत आहे. डिजिटल चॅट स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन Redmi K40 सीरीजची जागा घेऊन Redmi K50 नावाने सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये Snapdragon 870 SoC मिळेल. तसेच या फोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ OLED डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमधील मुख्य कॅमेरा 50MP चा असेल.
आगामी रेडमी फोन सुधारते हॅप्टिक्ससह सादर केला जाऊ शकतो. कथित रेडमी के50 स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी मिळेल. ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. तसेच या फोनमध्ये 8GB आणि 12GB RAM सह दोन व्हेरिएंट मिळतील, ज्यात 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. या आगामी रेडमी फोनची कोणतीही अधिकृत माहिती चिनी कंपनी Xiaomi ने दिलेली नाही.