Xiaomi नं काल एका लाँच इव्हेंटमधून आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत अनेक प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. यात Redmi Note 11 Pro सीरिजच्या दोन स्मार्टफोन्स आणि Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉचचा समावेश आहे. हे वॉच SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटरिंग आणि 10 दिवसांच्या बॅटरी लाईफ अशा स्पेसिफिकेशन्ससह लाँच झालं आहे.
Redmi Watch 2 Lite Price
Redmi Watch 2 Lite ची किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे वॉच Ivory, Black आणि Blue अशा तीन रंगात विकत घेता येईल. 15 मार्चपासून या वॉचची खरेदी Mi.com, Amazon, Reliance Digital, ऑफलाइन स्टोर आणि Mi रिटेल स्टोर्सवरून करता येईल.
Redmi Watch 2 Lite चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Watch 2 Lite मध्ये 1.55 इंचाचा चौरसाकृती टीएफटी एलसीडी एचडी डिस्प्ले आहे. रेडमी वॉच 2 लाईट 5 ATM वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात करण्यात आलं आला. यातील 262mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 10 दिवस पर्यंत चालते, असा दावा कंपनीनं केला आहे. कनेक्टिविटीसाठी यात ब्लूटूथ 5.0 सपोर्ट मिळतो. यातील 100 पेक्षा जास्त जास्त वॉच फेस पर्सनलायजेशनमध्ये मदत करतात.
यात 17 प्रोफेशनल वर्कआउट मोड्स देण्यात आले आहेत. तसेच यात SpO2, 24 तास हार्ट रेट मॉनिटरिंग, स्ट्रेस मॉनिटरिंग, ब्रेथ एक्सरसाइज आणि मेन्यूस्ट्रल सायकल असे अनेक हेल्थ फीचर्स मिळतात. सोबत अॅक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, इलेक्ट्रॉनिक कंपास आणि जीपीएस, असे सेन्सर देखील मिळतात.
हे देखील वाचा: