शाओमीने काल चीनमध्ये आपली Redmi Note 11 सीरीज सादर केली. कंपनीचे चाहते या सीरिजची आतुरतेने वाट बघत होते.त्याचबारोबर कंपनीने एक नवीन Smartwatch आणि TWS Earbuds देखील सादर केले आहेत. कंपनीने Redmi Watch 2 आणि Redmi Buds 3 Lite लाँच केले आहेत. चला या दोन्ही डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि फीचर्सची माहिती जाणून घेऊया.
Redmi Watch 2 आणि Redmi Buds 3 Lite ची किंमत
Redmi Watch 2 चीनीमध्ये 399 युआन (सुमरे 4700 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टवॉचचे Black, Blue आणि Ivory कलर व्हेरिएंट आणि Brown, Olive आणि Pink असे स्ट्रॅप्स उपलब्ध होतील. Redmi Buds 3 Lite ची किंमत 99 युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत 1200 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. लवकरच हे डिवाइस भारतात देखील दाखल होऊ शकतात.
Redmi Watch 2 specifications
Redmi Watch 2 मध्ये 1.6-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 100 वॉच फेस, ऑलवेज-ऑन डिस्प्ले, हार्ट रेट मॉनिटरिंग, Spo2 सेन्सर, स्लीप ट्रॅकिंग, GPS, GLONASS, Galileo आणि BeiDou असे स्पेक्स देण्यात आले आहेत. या डिवाइसमध्ये 117 फिटनेस मोड्स, NFC आणि XiaoAi AI Assistant सपोर्ट मिळतो. हा स्मार्टवॉच 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो, असे कंपनीने सांगितले आहे. कंपनीने या स्मार्टवॉचसह magnetic charger सपोर्ट दिला आहे. या वॉचमध्ये 5ATM वॉटर रेजिस्टन्स मिळतो.
Redmi Buds 3 Lite specifications
Redmi Buds 3 Lite ट्रू वायरलेस एयरबड्स इन-इयर डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. ब्लूटूथ 5.2 सह येणारे हे बड्स टच कंट्रोल्ससह सादर करण्यात आले आहेत. चार्जिंग केसमध्ये एक USB टाईप -C पोर्ट आहे. हे इयरबड्स सिंगल चार्जवर 18 तासांचा प्ले बॅक टाइम देऊ शकतात, यात चार्जिंग केसचा देखील समावेश असू शकतो.