शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

व्हा आणखी 'सुपरफास्ट'; रेडमीचा 5G मोबाईल पुढच्या वर्षी, किंमतही खिशाला परवडणारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 5:30 PM

सध्या बाजारात 5 जी चा वनप्लस, सॅमसंगचा मोबाईल उपलब्ध आहे. मात्र, या मोबाईलची किंमतच 50 हजारांपासून 80 हजारांपर्यंत आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान अगदी कमी किंमतीत आणणाऱ्या Xiaomi ने नुकतेच 48 मेगापिक्सलच्या सेन्सरचे परवडणारे फोन 11 हजारापासून आणले आहेत. याच कॅमेऱ्याचा फोन नुकत्याच लाँच झालेल्या मोटरोलाच्या 20 हजार ते वनप्लसच्या 33-50 हजाराच्या आसपास मिळतो आहे. आता 5 जी तंत्रज्ञान भारतात येऊ घातलेले आहे. अशातच रेडमीने पुन्हा किंमत युद्धामध्ये बाजी मारण्याची तयारी केली आहे. 

सध्या बाजारात 5 जी चा वनप्लस, सॅमसंगचा मोबाईल उपलब्ध आहे. मात्र, या मोबाईलची किंमतच 50 हजारांपासून 80 हजारांपर्यंत आहे. 5 जी तंत्रज्ञान नवीन असल्याने एवढ्या किंमती असल्या तरीही प्रोसेसरची किंमत पाहता ती काही 30 हजारांच्या खाली येण्याची चिन्हे नाहीत. यामुळे शाओमीने नेहमीप्रमाणे परवडणाऱ्या किंमतीत मोबाईल उपलब्ध करणाऱ्या उपकंपनी रेडमीद्वारे हे आव्हान पेलण्याचे ठरविले आहे. भारतात 2020 च्या सुरूवातीला 5 जी उपलब्ध होईल. यामुळे भारतीय बाजारपेठ काबिज करणाऱ्या शाओमीने रेडमीचा 5 जी फोन केवळ 20 हजारात आणण्याचे ठरविले आहे. 

जागतिक बाजारात मागणी असलेल्यांपैकी 5 जीच्या फोनची मागणी जोर धरत आहे. 2023 पर्यंत जवळपास 51 टक्के एवढा वाटा होणार आहे. सॅमसंग, हुवाई, वनप्लससह शाओमीचेही फोन आहेत. मात्र हे प्रिमिअय श्रेणीमध्ये येतात. अद्याप हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच देशांमध्ये 5 जी सुरू झाले आहे. 

दरम्यान, सॅमसंगच्या दाव्यानुसार कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या Galaxy S10 चे दक्षिण कोरियामध्ये 10 लाख फोन विकले आहेत. भारतात 2022 पर्यंत 5जी सेवा सुरू होण्याची शक्यता नाही. यामुळे तोपर्यंत कमी किंमतीत मोबाईल उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रेडमीला आणखी एका कंपनीचे आव्हान मिळणार आहे. ओप्पोने शाओमीला आव्हान दिले आहे. आता ओप्पोची उपकंपनी रिअलमीनेही 5 जी फोन लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, याची वेळ सांगितलेली नाही. पण किंमतीच्या बाबतीत रेडमीला टक्कर मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीOneplus mobileवनप्लस मोबाईलsamsungसॅमसंग