Reebok नं भारतात आपला पहिला Smartwatch सादर केला आहे. हा बजेट फ्रेंडली स्मार्टवॉच देशात Reebok ActiveFit 1.0 नावानं लाँच करण्यात आला आहे. हा वॉच SpO2 सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात हार्ट रेट सेन्सर देखील मिळतो. कंपनीनं याची किंमत 4,499 रुपये ठेवली आहे. हा अॅमेझॉनवरून ब्लॅक, ब्लू, वेनी आणि रेड कलरमध्ये 28 जानेवारीपासून विकत घेता येईल.
Reebok ActiveFit 1.0 चे स्पेसिफिकेशन
Reebok ActiveFit 1.0 मध्ये 1.3 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक गोलाकार डिस्प्ले आहे. या स्मार्टवॉचमधील IP67 रेटिंग धूळ आणि पाण्याच्या शिंतोड्यांपासून संरक्षण करते. या वॉचवर स्मार्टफोनवरील कॉल आणि मेसेजसह सोशल मीडिया अॅप नोटिफिकेशन देखील येतात. वॉचच्या मदतीने कॅमेरा व म्यूजिक कंट्रोल करता येतात. तसेच वॉचमध्ये बिल्ट-इन गेम्स देखील देण्यात आले आहेत.
यात 24x7 हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सीजन मॉनिटर (SpO2), स्लीप मॉनिटरिंग आणि सीडेंट्री रिमाइंडर असे हेल्थ फीचर्स मिळतात. रीबॉकच्या या वॉचमध्ये तुम्हाला 15 फिटनेस ट्रॅकिंग मोड मिळतील. तसेच महिलांसाठी पीरियड सायकल ट्रॅकिंगची सोय देखील आहे. सोबत कॅलरी आणि स्टेप ट्रॅकर देखील मिळतो. हा स्मार्टवॉच सिंगल चार्जवर 15 दिवसांपर्यंतचा बॅकअप देतो.
हे देखील वाचा: