रेल्वेचे तिकीट काढायचे म्हटले अनेक दिव्यांतून पार जावे लागते. तिकीट अव्हेलेबल दिसते पण पैसेच कापले जातात, पैसे कापताना जे गोल गोल चक्र फिरू लागते की तिकीटच मिळत नाही. वेटिंग, तत्काळची तर बातच न्यारी. अशा या समस्यांपासून रेल्वेने प्रवाशांची सोडवणूक करण्याचा विडा उचलला आहे. तुमचा रिफंड दोन तासांत तुमच्या खात्यात मिळणार आहे.
पुढील वर्षी मार्चपर्यंत नेक्स्ट जेनरेशन ई-टिकिंग प्लेटफार्म विकसित केला जाणार आहे. यामुळे तिकीट काढण्याचा वेग कित्येक पटींनी वाढणार आहे. आयआरसीटीसीच्या दाव्यानुसार ९२ टक्के लोकांना दोन तासांत रिफंड दिला जात आहे. आता ज्या लोकांना रिफंड येत नाहीय ते त्या ८ टक्क्यांत आहेत, असे समजावे.
आयआरसीटीसी आणि क्रिस तिकीट प्लॅटफॉर्म अपडेट करत आहे. तत्काळ तिकीटे काढण्यास जी समस्या येते ती दूर करण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे रेल्वे करत आहे. नवीन व्हर्जन पुढील वर्षी मार्चमध्ये लागू केले जाणार आहे, असे आयआरसीटीसीचे सीएमडी संजय कुमार जैन यांनी म्हटले आहे.
आयआरसीटीसीने आपल्या वेबसाइटवर ऑटो पे नावाची सेवा सुरू केली आहे. तिकीट बुक केल्याशिवाय बँक खात्यातून पैसे कापले जात नाहीत. ज्यांची तिकिटे रद्द झाली आहेत किंवा तिकीट बुक झालेले नाही त्यांचे पैसे परत केले जात आहेत. लवकरच 100 टक्के टार्गेट पूर्ण केले जाणार असल्याचे रेल्वेचे अधिकारी म्हणाले. ऑटो पे सिस्टम दर तासाला याचा आढावा घेते आणि पैसे परत करते, असे ते म्हणाले. बँक खात्यातून पैसे कापले गेले असले तरी ते वळते केले जात नाहीत, ते दोन तास ब्लॉक केले जातात आणि नंतर पुन्हा प्रवाशाच्या खात्यात टाकले जातात, असे ते म्हणाले.
तसेच ज्यांचे तिकीट वेटिंगवर असेल आणि त्यांना पैसे कापले जावेत असे वाटत नसेल तर तसेही केले जाणार आहे. ज्यांना वेटिंग तिकीट नकोय त्यांचे पैसे कापले जाणार नाही. ट्रांजेक्शन फेल झाले तरीही बँकेतून पैसे कापले जाणरा नाहीत. ते पैसे दोन तासांसाठी ब्ल़ॉक केले जातील आणि पुन्हा टाकले जातील.