रिलायन्स एजीएम 2021 ची तारीख आता समोर आली आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा या महिन्याच्या अखेरीस केली जाईल. कंपनीने सांगितले आहे कि रिलायन्स एजीएम 2021 चे आयोजन 24 जून, दुपारी 2 वाजता केले जाईल. हि सभा गेल्या काही वर्षांप्रमाणे YouTube च्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाऊ शकते. कंपनी या सभेच्या माध्यमातून 5G फोन तसेच, 5G सेवेची माहिती देईल, अशी चर्चा आहे. (Reliance may annouce Jio 5G and Jio 5G Phone in AGM 2021)
Reliance Jio ने गेल्यावर्षी कंपनीने भारतात स्वस्त Jio 5G फोन घेऊन येण्यासाठी Google सोबत हात मिळवणी केल्याची माहिती दिली होती. हा देशातील सर्वात स्वस्त 5G फोन असेल, अशी माहिती समोर आली होती. त्याचबरोबर कंपनीने Android वर पण करण्यास सुरुवात केली होती. यावर्षी पण चेअरमन मुकेश अंबानी स्वस्तातल्या Jio 5G फोन आणि Jio 5G फोनबाबत घोषणा करू शकतात.
कंपनी स्वस्तातल्या 5G फोनसोबतच 5G सेवा आणि JioBook लॅपटॉपबाबत घोषणा करू शकते. जियो 5G फोन 2,500 रुपयांच्या किंमतीत येऊन सध्या 2G वापरात असलेल्या लाखो ग्राहकांना 5G नेटवर्कवर घेऊन येईल. तर Jio 5G सेवा पूर्णपणे देशातील तंत्रज्ञानाचा वापर करेल. कंपनीने यापूर्वी 5जीच्या चाचणीत 1Gbps पेक्षा जास्त स्पीड मिळवला होता.
मार्च मध्ये JioBook चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. त्यानुसार, हा लॅपटॉप एका कस्टम अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमसह सादर केला जाईल. यात Qualcomm Snapdragon 665 प्रोसेसर मिळू शकतो. Jio ने Google आणि Qualcomm सह भागेदारी केली आहे त्यामुळे असे स्पेसिफिकेशन्स मिळण्याची शक्यता आहे. JioBook लॅपटॉपमध्ये 1366×768 रेजॉल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल. यात 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेला वेरिएंट पण या लॅपटॉपमध्ये मिळू शकतो.