रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड (RIL) ची आज 44वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आहे. या बैठकीत रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी कंपनीच्या नवीन प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसच्या लाँचची घोषणा करू शकतात. या इव्हेंटमध्ये स्वदेशी 5G नेटवर्कच्या लाँचची माहिती देण्यात येईल, तसेच कंपनीच्या स्वस्त 5G स्मार्टफोनची लाँच डेट देखील सांगितली जाऊ शकते.
Reliance AGM 2021 चे थेट प्रक्षेपण
Reliance AGM 2021 24 जून दुपारी 2 वाजता सुरु होईल. हा इव्हेंट कंपनीच्या वेबसाइटवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच My Jio App आणि जियोच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून देखील हा इव्हेंट लाईव बघता येईल. Reliance AGM 2021 ची Youtube लिंक
Reliance AGM 2021 मध्ये होणाऱ्या घोषणा
Reliance AGM 2021 मध्ये कंपनी भविष्यातील प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसची घोषणा करू शकते. यात गुगल सोबत मिळून तयार करण्यात आलेल्या स्वस्त 5G स्मार्टफोनचा समावेश असू शकतो. Reliance AGM 2021 मध्ये कंपनी JioBook लॅपटॉप लाँच करू शकते, अशी माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे. त्याचबरोबर कंपनी पूर्णपणे स्वदेशी 5G टेक्नॉलॉजीचा रोडमॅप देखील जगासमोर ठेऊ शकते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रिलायन्स जियोने मुंबईत 5G ट्रायल सुरु केले आहेत.
Jio-Google 5G स्मार्टफोन
रिलायन्स जियो Reliance AGM 2021 मध्ये आपला स्वस्त 5G फोनची माहिती देऊ शकते. या स्मार्टफोनसाठी कंपनीने गुगल सोबत भागेदारी केली आहे. सह मिलकर तयार करत आहे. कोरोना महामारीमुळे या स्मार्टफोनचा लाँच लांबला असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. परंतु कंपनी या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत सांगू शकते.