जर प्लॅनसोबत मिळणारा डेटा संपला तर युजर्सच्या सोयीसाठी रिलायन्स जिओकडे (Reliance Jio) डेटा बूस्टर प्लॅन उपलब्ध आहेत. दरम्यान, कंपनीने आता जिओचा 61 रुपयांचा बूस्टर प्लॅन अपडेट केला आहे.
या प्लॅनमध्ये यूजर्सना पूर्वीपेक्षा जास्त डेटा ऑफर केला जाणार आहे. 61 रुपयांच्या या जिओ प्लॅनमध्ये यूजर्सना आधी 6 जीबी हाय स्पीड डेटा दिला जात होता, पण आता हा प्लॅन यूजर्सना 4 जीबी अतिरिक्त डेटा देईल आणि यासाठी यूजर्सकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.
म्हणजेच आता 61 रुपयांच्या रिचार्जवर तुम्हाला 6 जीबी ऐवजी 10 जीबी डेटाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, हा एक डेटा बूस्टर प्लॅन आहे, तुम्हाला या प्लॅनसह कॉल किंवा एसएमएसचा लाभ दिला जाणार नाही.
61 रुपयांव्यतिरिक्त 'हे' आहेत डेटा बूस्टर प्लॅन रिलायन्स जिओचे 15 रुपये, 25 रुपये, 121 रुपये आणि 222 रुपयांचे चार डेटा बूस्टर प्लॅन्स आहेत. रिलायन्स जिओच्या अधिकृत साइटवर रिचार्जसाठी 61 रुपयांचा प्लॅन नवीन अपडेट म्हणजेच 10 जीबी डेटासह लिस्ट करण्यात आला आहे. डेटा लिमिट पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या प्लॅनमध्ये उपलब्ध हाय स्पीड लिमिट 64 Kbps पर्यंत कमी होईल. 15 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा, 25 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा, 121 रुपयांच्या प्लॅनमध्ये 12 जीबी डेटा आणि 222 रुपयांच्या प्लॅनमध्ये रिचार्ज केल्यास 50 जीबी हायस्पीड डेटाचा लाभ मिळेल.