नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपले दोन स्वस्त प्लॅन बंद केले आहेत. हे दोन प्लॅन 49 रुपये आणि 69 रुपयांचे होते, केवळ जिओफोन वापरकर्त्यांसाठी या दोन योजना आणल्या होत्या. हे प्लॅन आता रिलायन्स जिओच्या वेबसाइटवरून काढून टाकण्यात आले आहेत. म्हणजे वापरकर्त्यांना यापुढे त्या प्लॅननं रिचार्ज करता येणार नाही. रिलायन्स जिओने त्यांना शॉर्ट व्हॅलिडिटी प्लॅन असे नाव दिले होते. म्हणजे कमी दिवसांच्या वैधतेसह या योजना आणल्या होत्या. ते स्वस्त प्लॅनच्या युजर्ससाठी फायदेशीर ठरत होते. 49 आणि 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय विशेष?हे दोन्ही प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येत होते. दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळत होत्या. ते जवळपास 5 महिन्यांपूर्वी बाजारात आणले गेले होते. 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अमर्यादित कॉलिंग, 250 नॉन-जिओ मिनिटे आणि इतर नेटवर्कला 25 एसएमएस देण्यात येत होते. इंटरनेटसाठी ग्राहकांना 14 दिवसांसाठी 2 जीबी डेटाही मिळत होता.त्याच वेळी 69 रुपयांच्या योजनेत, जिओ टू जिओ अमर्यादित कॉल, अन्य नेटवर्कसाठी 250 नॉन-जिओ मिनिटे आणि 25 एसएमएस उपलब्ध होते. ग्राहकांना इंटरनेटसाठी 14 दिवसांच्या वैधतेमध्ये एकूण 7 जीबी डेटा वापरण्यास मिळत होतात. दोन्ही योजनांमध्ये जिओ अॅप्सची विनामूल्य सदस्यता दिली जात होती.
हेही वाचा
रेकॉर्ड ब्रेक! डिझेलची किंमत पुन्हा भडकली, पेट्रोललाही मागे सोडलं
उलवेत बनावट रॉयल्टी चलनप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल
टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश
मोदी सरकारच्या 'या' योजनेतून थेट शेतकर्यांच्या खात्यात पाठविले जातात पैसे; जाणून घ्या सर्व काही
इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर
Rajasthan Political Crisis: काहीतरी गडबड आहे! बरंच काही सांगून जातंय वसुंधरा राजेंचं मौन
कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना