Reliance Jio ने दिवाळीच्या निमित्ताने देशात JioPhone Next लाँच केला आहे. हा कंपनीचा पहिला 4G स्मार्टफोन आहे. फिचर फोनवरून स्मार्टफोनकडे वळणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीने हा फोन सादर केला आहे. तसेच आता कंपनी Budget Laptop सादर करण्याची योजना बनवत आहे. जियोचा स्वस्त लॅपटॉप JioBook आता स्पेसिफिकेशन्ससह गीकबेंच सर्टिफाइड झाला आहे.
JioBook चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबरच्या या लिस्टिंगमधून जियोबुकच्या Jio NB1112MM या मॉडेल नंबरचा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी हा लॅपटॉप भारतीय सर्टिफिकेशन्स साईट BIS वर दिसला होता. बीआयएसवर NB1118QMW, NB1148QMW आणि NB1112MM असे तीन मॉडेल नंबर दिसले होते.
हा एक अँड्रॉइड 11 आधारित लॅपटॉप असेल, असे गीकबेंचवरून समजले आहे. ज्यात 1.99गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो, त्याचबरोबर मीडियाटेक एमटी6788 चिपसेट मिळेल. लिस्टिंगनुसार JioBook मध्ये 2GB RAM असेल. जियोबुकला गिकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 1178 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 4246 स्कोर मिळाला आहे.
JioBook चे स्पेसिफिकेशन्स
JioBook एक अँड्रॉइड लॅपटॉप असेल. यात 1366 x 768 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या एचडी डिस्प्ले देण्यात येईल. JioBook मध्ये 2GB LPDDR4x RAM देण्यात येईल, यापेक्षा जास्त व्हेरिएंट देखील बाजारात येऊ शकतात. या लॅपटॉपमध्ये 64GB पर्यंत eMMC 5.1 storage मिळू शकते. यात 4G कनेक्टिविटी देण्यात येईल, त्यासाठी स्नॅपड्रॅगन एक्स12 मॉडेमचा वापर केला जाईल. त्याचबरोबर ब्लूटूथ, ड्युअल बँड वायफाय आणि एचडीएमआई पोर्ट देण्यात येईल.