नवी दिल्ली - दिवाळीआधी रिलायन्स जिओने आपल्या युजर्सना दणका दिला आहे. कॉल टर्मिनेशन चार्जशी संबंधीत नियमांमुळे जिओने आपली कॉलिंग पॉलिसी बदलली आहे. जिओने फ्री कॉलिंगची सुविधा बंद केल्याने अनेक युजर्सना धक्का बसला आहे. यातच आता आणखी एक धक्का बसला आहे. युजर्सना प्रीपेड रिचार्जवर फुल टॉक टाईम बेनिफिट मिळणार नाहीत. जिओ युजर्सना आता जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी ही सुविधा मोफत देण्यात आली होती.
जिओने सुरुवातीला आपल्या प्रीपेड पोर्टफोलियोसाठी अनेक प्लॅन आणले होते. सब्सक्राइबर्सना रिचार्जवर फुल टॉक टाईम देण्याची ऑफर ही काही प्लॅनमध्ये होती. त्यामुळे जास्त वॉईस कॉलिंगची गरज असलेले युजर्ससाठी फुल टॉक टाईमवाले प्रीपेड प्लॅन्स अधिक महत्त्वाचे होते. तसेच युजर्सनेही त्या प्लॅन्सना खूप जास्त पसंती दिली. मात्र आता कंपनीने फुल टॉक टाईम बेनिफिट बंद केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता प्रीपेड रिचार्जवर फुल टॉक टाईम बेनिफिट मिळणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.
जिओने आपल्या ग्राहकांना दिलासा देत फ्री टॉकटाईम देण्याचा निर्णय घेतला आहे. फ्री टॉकटाईमची मर्यादा आता 30 मिनिटे असणार आहे. जिओची फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार असा प्रश्न अनेक युजर्सना पडला आहे. जिओ प्लॅन अॅक्टिवेट असेपर्यंत फ्री कॉलिंगची सुविधा असणार आहे. युजर्सने केलेला रिचार्ज प्लॅन संपल्यानंतरच त्यांना IUC चार्जेस द्यावे लागणार आहेत. त्यासाठी वेगळा आययूसी टॉप-अप रिचार्ज करावा लागणार आहे. जिओने 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत टॉप-अप वाउचर इंट्रोड्यूस केले आहेत.
10 रुपयांच्या प्लॅनवर 1 जीबी आणि 100 रुपयांच्या रिचार्जवर 10 जीबी अॅडिशनल डेटा युजर्सना मिळणार आहे. तसेच 10 रुपयांच्या वाउचरमध्ये 124 मिनिटाचं नॉन जिओ टॉकटाईम तर 100 रुपयाच्या वाउचरमध्ये 1,362 मिनिटांचा टॉकटाईम देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीने पॅक रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा फोन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 30 मिनिटांचा फ्री टॉकटाईम मिळणार आहे. या वन-टाईम ऑफर प्लॅनच्या घोषणेनंतर पहिल्या 7 दिवसांसाठी ही ऑफर उपलब्ध असणार आहे.
रिलायन्स जिओच्या घोषणेनंतर ट्विटरवर boycott-Jio हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला होता. काही ग्राहकांनी जिओच्या प्लॅनवर टीका केली आहे. जिओ युजर्सना जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. 10 ऑक्टोबरनंतर लागू करण्यात येईल अशी माहिती याआधी जिओने आपल्या युजर्सना दिली होती. मात्र आता याबाबत ट्वीट करून जिओने नवीन अपडेट दिलं आहे.
जिओ युजर्सने केलेला रिचार्ज प्लॅन संपल्यानंतरच त्यांना IUC चार्जेस द्यावे लागणार आहेत. प्लॅन अॅक्टिवेट असेपर्यंत फ्री कॉलिंगची सुविधा असणार आहे. जिओने दिलेल्या माहितीनुसार, '9 ऑक्टोबर किंवा त्याधी कोणताही प्लॅनसाठी जिओ नंबरवर रिचार्ज केला असल्यास तो प्लॅन संपेपर्यंत (जिओ व्यतिरिक्त अन्य नेटवर्कवर देखील) फ्री कॉलिंगची सुविधा युजर्सना मिळणार आहे.' त्यामुळेच युजर्सना जिओ प्लॅनची व्हॅलिडीटी चेक करावी लागणार आहे.
व्होडाफोन-आयडिया आता आपल्या युजर्सना फ्री कॉलिंगची सुविधा देणार आहे. Vodafone Idea Limited (VIL) ने गुरुवारी (10 ऑक्टोबर) IUC संबंधीत एक मोठी घोषणा केली आहे. युजर्सना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस (IUC) लागणार नसल्याची माहिती व्होडाफोन-आयडियाने दिली आहे. कंपनीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 'व्होडाफोनवरून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत. आम्ही तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा आनंद घ्या. व्होडाफोन अनलिमिटेड प्लॅन्सवर फ्री कॉल' असं ट्वीट व्होडाफोनने केलं आहे. व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये सुरुवातीचा प्रीपेड प्लॅन 119 रुपयांचा आहे. 28 दिवस व्हॅलिडीटी, 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा या प्लॅनमध्ये मिळते.
रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नेहमी खास ऑफर्स आणत असतं. मात्र आता जिओ युजर्ससाठी एक बॅडन्यूज आहे. जिओने दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम ऑपरेटर्सना आपल्या युजर्सद्वारे अन्य ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर मोबाईल फोन कॉल्ससाठी 6 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जाणार आहे. मात्र हे चार्जेस युजर्सने दुसऱ्या जिओ युजर्सला कॉल केला असेल किंवा व्हॉट्सअॅप आणि अन्य प्लॅटफॉर्मवरून कॉल केल्यास लागू होणार नाहीत. 2017 मध्ये ट्रायने इंटरकनेक्ट युसेज चार्ज (IUC) 14 पैशांवरून 6 पैसे प्रति मिनिट केले होते. तसेच जानेवारी 2020 मध्ये हे संपेल असं सांगितलं होतं. त्यानंतर आता जिओने आउटगोइंग कॉलसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं सांगितलं आहे.
जिओवरुन व्हाईस कॉलिंग सेवा मोफत देण्यात येत असल्याने कंपनीला आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या अर्थात भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना ट्रायच्या नियमानुसार 13, 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागत होती. त्यामुळे आता जिओने ट्रायच्या नियमांपासून वाचण्यासाठी अन्य नेटवर्कवर कॉलिंग सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच इन्कमिग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत असणार आहे. जिओ युजर्सना जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र याची भरपाई कंपनी तेवढ्याच पैशात मोफत इंटरनेट डेटा देणार असल्याची माहिती जिओने दिली आहे.