नवी दिल्ली - रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे. जिओच्या ग्राहकांना अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन्ससह व्हॅलिडिटी, कॉलिंग आणि डेली डेटासारखे अनेक फायदे मिळतात. काही महिन्यांपूर्वी जिओने IUC चार्ज आकारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ग्राहक नाराज झाले होते. अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 6 पैसे प्रति मिनिट आकारणी होऊ लागली होती. त्यानंतर ग्राहकांसाठी जिओने प्रीपेड प्लॅनसह नॉन जिओ मिनिटे देण्यास सुरुवात केली.
जिओचं डेटा वाऊचर 11 रुपयांपासून सुरू होतं ज्यामध्ये 400 एमबी डेटा ग्राहकांना दिला जातो. तर आययूसी टॉक वाऊचरची सुरुवात ही 10 रुपयांपासून होते. त्यामुळे जिओचा सर्वात स्वस्त टॉपअप प्लॅन फक्त 10 रुपयांचा आहे. या 10 रुपयांच्या रिचार्जमध्ये 124 IUC मिनिटे मिळतात. तसेच एक जीबी डेटाही देण्यात आला आहे. त्यामुळे अन्य नेटवर्कवर ग्राहक कॉल करण्यासाठी जितक्या वेळेस 10 रुपयांचा टॉप अप करणार तितक्या वेळेस त्याला एक जीबी डेटा मोफत मिळणार आहे.
रिलायन्स जिओचे 'अच्छे दिन' सुरूच; नफ्यात तब्बल 62 टक्क्यांची वाढ
डेली डेटा संपल्यानंतर ग्राहकाला 3 जीबी अथवा त्यापेक्षा जास्त डेटा हवा असल्यास जास्त किंमतीचं आययूसी टॉक टाइम वाऊचर रिचार्ज करावा लागणार आहे. 50 रुपयांचं आययूसी टॉक टाइम वाऊचर रिचार्ज केल्यास 39.37 रुपये म्हणजेच 656 आययूसी मिनिटे मिळणार आहेत. त्यासोबतच 5 जीबी फ्री डेटा मिळणार आहे. तसेच 51 रुपयांच्या डेटा वाऊचरवर 3 जीबी डेटा मिळणार आहे. जास्त डेटा हवा असल्यास रिलायन्स जिओचा 251 रुपयांचं डेटा वाऊचर बेस्ट आहे. 51 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या प्लॅनमध्ये डेटासोबतच 2 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो.
JIO Wifi Calling Feature : जिओची नवीन सेवा; व्हॉइस-व्हिडिओ कॉलिंग होणार फ्री
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना नवीन वर्षात आणखी एक सेवा भेट दिली आहे. देशभरात कुठेही आणि कोणत्याही 'वाय- फाय'वर काम करणारी व 150 पेक्षा अधिक हँडसेट मॉडेल्सला सपोर्ट करणारी राष्ट्रव्यापी व्हॉईस आणि व्हिडिओ ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवेची रिलायन्स जिओने सुरुवात केली. जिओच्या या नवीन सेवेमुळे आता कोणत्याही अतिरिक्त शुल्क विना वाय-फायद्वारे स्पष्ट व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करणे शक्य होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर
चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' दिवशी घेणार रामलल्लाचं दर्शन
शिवसेनेचे आदित्य विरुद्ध मनसेचे अमित; दोन युवा ठाकरेंच्या वाटचालीकडे लक्ष
'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र
राज ठाकरे यांनी नुसता ढोल बडवू नये; प्रकाश आंबेडकर यांची महाधिवेशनावर टीका