नवी दिल्ली : Reliance Jio लवकरच ५ जीची ट्रायल सुरू करणार आहे. ही जरी चांगली बाब असली तरीही जिओ ४जी ग्राहकांना पुन्हा एकदा जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. जिओनेच डेटाची किंमत 200 टकक्यांनी कमी केली होती. मात्र, आता जिओच 1 जीबी डेटाची किंमत वाढविण्याची मागणी घेऊन ट्रायच्या दरबारी गेली आहे.
तीन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने देशात 4 जी आणून धमाका उडविला होता. सुरुवातीला मोफत, नंतर काही शे पैसे आकारून जो डेटा महिन्याला 500 रुपये मोजूनही मिळत नव्हता तो दिवसाला उपलब्ध केला. हा डेटा 15 रुपयांना 1 जीबी यापेक्षाही कमी किंमतीत मिळत होता. मात्र, आता जिओनेच ट्रायकडे धाव घेतली असून या डेटाची किंमत वाढविण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी जिओनेच प्लॅनच्या किंमती वाढविल्या होत्या. तसेच किंमती वाढवत असताना त्यांची व्हॅलिडिटीही कमी केली होती. दोन महिन्यांपूर्वी 84 दिवसांच्या पॅकला ग्राहक 399 रुपये मोजच होते. मात्र, आता त्यांना 550 रुपये मोजावे लागत आहे.
जिओचा पुन्हा धमाका! 5G ची ट्रायल घेणार; 4G सारखे पुन्हा मोफत देणार?
आता पुन्हा जिओ डेटा पॅक वाढविणार असल्याने ग्राहकांना फटका बसणार आहे. पुढील 6 ते 9 महिन्यांमध्ये 1 जीबीची फ्लोअर प्राईज 15 रुपयांवरून 20 रुपये करण्याचा प्रस्ताव जिओने ट्रायला दिला आहे. ईटी टेलिकॉमच्या रिपोर्टनुसार वायरलेस डेटा रेट आता ग्राहकाच्या डेटा वापरावर अवलंबून असणार आहेत. मात्र, व्हॉईस टेरिफमध्ये सध्या बदल करण्याचा जिओचा विचार नाही. असे केल्यास बाजारात अस्थिरता येऊ शकते आणि हे दर लागू करण्यास अडचणी येऊ शकतात.
TikTok चे नवे अॅप आले; गाणी ऐकताच नाही, गाताही येणार
जिओने ट्रायला सांगितले की, एकदा मोठी वाढ करण्यापेक्षा थोडी, थोडी अशी दोन तीन वेळा वाढ करावी. कारण भारतीय युजर किंमतींना घेऊन मोठ्या प्रमाणावर संवेदनशील असतात. यामुळे महाग झाल्याचे दिसणार नाही.