शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
9
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
10
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
11
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
12
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
13
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
14
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
15
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
16
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
17
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
18
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
19
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
20
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

Jio चा शानदार प्लॅन, कमी किमतीत दररोज 1.5GB डेटा आणि बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 1:37 PM

Jio : जिओचा 239 रुपयांचा प्लॅन आहे, तर व्होडाफोन-आयडियाचा 299 रुपयांचा प्लॅन आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडियाने (Vodafone-Idea) आपल्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. अशा स्थितीत कोणता प्लॅन उत्तम आहे, याबाबत युजर्स संभ्रमात आहेत. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला जिओ आणि व्होडाफोन-आयडियाच्या 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लॅननबद्दल सांगणार आहोत. जिओचा 239 रुपयांचा प्लॅन आहे, तर व्होडाफोन-आयडियाचा 299 रुपयांचा प्लॅन आहे. जिओ कमी किमतीत अधिक फायदे देत आहे. 

व्होडाफोन-आयडियाचा 299 रुपयांचा प्लॅनव्होडाफोन-आयडियाच्या 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह, युजर्संना दररोज 1.5GB डेटा मिळतो. यासोबतच, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. तसेच, यामध्ये सर्व Vi Hero Unlimited बेनिफिट्स यांचा समावेश आहे. या अतिरिक्त फायद्यांमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights सारख्या ऑफरचा समावेश आहे. तसेच,  Binge All Night ऑफरसह, युजर्स दररोज 12 ते सकाळी 6 दरम्यान अमर्यादित डेटा वापरू शकतात. प्लॅन Vi Movies आणि TV Classic च्या ओव्हर-द-टॉप (OTT) फायद्यांसह देखील येतो. दरम्यान, कंपनीने किंमत वाढण्यापूर्वी, या प्लॅनची ​​किंमत 249 होती.

जिओचा 239 रुपयांचा प्लॅनजिओचा सुद्धा असाच प्लॅन आहे, परंतु जास्त बेनिफिट्ससह किंमत खूपच कमी आहे. जिओच्या 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजरला 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. यामध्ये यूजरला दररोज 1.5GB डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 42GB डेटा. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचा एक्सेस मिळतो.

एअरटेलचा 299 रुपयांचा प्लॅनएअरटेलचा 299 रुपयांचा प्लॅनही आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे आणि दररोज 1.5GB डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस युजर्सला मिळतात. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाईल इडिशनचे फ्री ट्रायल, फ्री हॅलोट्यून आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.

दरम्यान, जर तुम्ही तिन्ही प्लॅन पाहिले तर, जिओ सर्वोत्तम असल्याचे दिसून येते, कारण जिओ कमी किमतीत अधिक लाभ देत आहे.

टॅग्स :Jioजिओtechnologyतंत्रज्ञानVodafoneव्होडाफोनAirtelएअरटेलIdeaआयडिया