नवी दिल्ली : रिलायन्स जिओने युजरना मोठी ऑफर देऊ केली असून नवीन प्लान नाही तर जुन्या प्लॅन्वरच दुप्पट डेटा आणि टॉकटाईम दिला आहे. कंपनीने काही ४जी प्लॅनमध्ये सुधारणा केली आहे.
कंपनी ११, २१, ५१, १०१ आणि २५१ रुपयांपासून जिओ युजरना डेटा व्हाऊचर देत आहे. २५१ रुपयांचा प्लॅन सोडून बाकी सर्व प्लॅनमध्ये जिओ Non-Jio FUP मिनिट उपलब्ध केले आहेत. यासोबतच आता दुप्पट डेटा देण्यात येत आहे.
11 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरना ८०० एमबीचा डेटा दिला जात आहे. शिवाय ७५ नॉन-जियो FUP मिनिटही देण्यात येत आहेत. तर २१ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा आणि २०० नॉन-जियो FUP मिनिटही देण्यात येत आहेत. ५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ६ जीबी डेटा आणि ५०० नॉन-जियो FUP मिनिटही देण्यात येत आहेत. १०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये १२ जीबी डेटा आणि १००० नॉन-जियो FUP मिनिटही देण्यात येत आहेत. या सर्व प्लॅनची वैधता आधी जेवढी होती तेवढीच ठेवण्यात आली आहे. तर २५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
कंपनीचे शेवटचा डेटा व्हाऊचर प्लॅन २५१ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा प्रतिदिन देण्यात आला आहे. या प्लॅनची वैधता ५१ दिवसांचीच असून हेच फायदे कायम ठेवण्यात आले आहेत.
या आधी ११ रुपयांना ४०० एमबी डेटा दिला जात होता. २१ रुपयांमध्ये १ जीबी डेटा, आणि ५१ रुपयांमध्ये ३ जीबी डेचा दिला जात होता. तर १०१ रुपयांमध्ये ६ जीबी डेटा दिला जात होता. तसेच यामध्ये नॉन जिओ एफयुपी मिनट दिले जात नव्हते.