रिलायन्स जिओने आपली एक सर्व्हिस बंद केली आहे. याची कोणाला कानोकान खबर नव्हती. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप दिसायचे बंद झाल्याने हे समजले आहे. मोबाईल सिक्युरिटी अॅप जिओ सिक्युरिटी बंद करण्यात आले आहे. हे अॅप आजवर मोफत उपलब्ध करण्यात आले होते.
जिओने हे अॅप पोस्टपेड आणि प्रिपेड अशा दोन्ही युजरसाठी हटविले आहे. जिओ वेबसाईटवरूनही हे अॅप हटविण्यात आले आहे. JioSecurity हे एक मोबाईल अँटीव्हायरस आहे, जे Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होते. सिक्योरिटी, फाइंड माई फोन, डिवाइस रिकवरी सारखे फिचर्स देण्यात आले होते.
Google Play Store वरून JioSecurity पूर्णपणे हटविण्यात आले आहे. तर अॅपलच्या प्लेस्टोअरवर ते सध्यातरी दिसत आहे. परंतू तिथूनही ते हटविले जाणार आहे. हे अॅप पेड व्हर्जनवर आणले जाईल की नाही? सध्या याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.Jio वापरकर्त्यांना कोणत्याही सायबर हल्ल्याबद्दल किंवा इतर गोष्टींपासून वाचविण्याचे काम हे अॅप करत होते. तुमचे वाय-फाय असुरक्षित असल्यास, जिओ सिक्युरिटी तुम्हाला त्याबद्दल अलर्ट देत होते. तुमच्या डिव्हाइसवर सायबर हल्ल्याचा धोका वाढला तर हे अॅप सक्रीय होत होते.