सन फ्रॅन्सिस्काे : एकेकाळी जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले इलाॅन मस्क यांच्यावर बिकट परिस्थिती ओढावली आहे. सन फ्रॅन्सिस्काे येथील ट्विटर मुख्यालयाचे भाडे थकले असून, इमारतीच्या मालकाने कंपनीवर खटला दाखल केला आहे. प्राप्त माहितीुसार, सन फ्रॅन्सिस्काे येथील मुख्यालय हार्टफाेर्ड इमारतीच्या ३०व्या माळ्यावर आहे. कार्यालयाचा भाडेकरार पाच दिवसांमध्ये संपणार आहे. इमारत मालकाने १६ डिसेंबरला मस्क यांना सूचना दिली हाेती. मात्र, भाडे न दिल्यामुळे अखेर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या कार्यालयाचे १.३६ लाख डाॅलर्स एवढे भाडे थकीत आहे. यासंदर्भात ट्विटरकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. इलाॅन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वीच ट्विटरचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या खर्चात माेठी कपात केली आहे. (वृत्तसंस्था)
मालक म्हणतात, जागा रिकामी करा- ट्विटरच्या जगभरातील विविध कार्यालयांचेदेखील भााडे थकीत आहे. - मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतरच इमारत मालकांना भाडे मिळालेले नाही. - त्यामुळे जागा रिकामी करण्यास ट्विटरला सांगण्यात येत आहे. - काही ठिकाणी तर जागा मालकांकडून कंपनीला केवळ जागा रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनी थकीत भाडेही मागितलेले नाही.