मुंबई -व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी गेल्या काही दिवसांपूर्वी नवीन फीचर 'डिलिट फॉर एव्हरिवन' आणले. या फिचरच्यामाध्यमातून एखाद्या चॅटमध्ये किंवा ग्रुपवर चुकीने पाठविलेला मेसेज डिलीट करता येते. यामुळे युजर्स खूप खुश झाले. मात्र, एका रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की, व्हॉट्सअॅपवरुन पाठविलेला मेसेज डिलीट केला असेल, तर तो तसाच डिव्हाईसवर राहतो आणि तो वाचताही येऊ शकतो. स्पॅनिश अँड्रॉईड ब्लॉग अँड्रॉईड जेफेने हा दावा केला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज कित्येक तासांनी पुन्हा वाचले जाऊ शकतात. मेसेज अँड्रॉईडच्या नॉटिफिकेशन सेंटरमध्ये स्टोअर असतात. त्यामुळे तुम्हाला फक्त रेकॉर्ड पाहण्याची गरज आहे, ज्यामुळे तुम्ही मेसेज पुन्हा वाचू शकता, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification History) नावाचे एक अॅप आहे, जे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून हिस्ट्री सेटिंग्समधून व्हॉट्सअॅप नॉटिफिकेशन रिकव्हर केले जाऊ शकतात, असेही यामध्ये म्हटले आहे.
डिलीट करण्यात आलेले मेसेज कसे वाचता येतील?नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification History) नावाचे एक अॅप आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. डाऊनलोड केल्यानंतर हे अॅप इंस्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल. ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन कंटेंटमध्ये वाचता येतील. तुम्हाला पाठवलेला मेसेज डिलीट करण्यात आला असेल तरीही तो वाचला जाऊ शकेल. याशिवाय कोणत्याही अतिरिक्त अॅप ऐवजी नोटिफिशेकचा वापर करु शकतो. तसेच, फोनच्या होमस्क्रीन बटनवर जास्तवेळ प्रेस केल्यानंतर Widgets > Activities > Settings > Notification log येऊ शकते. मात्र, फोन एकदा रिस्टार्ट केला असेल तर मेसेज वाचता येणार नाहीत. जास्तीत जास्त 100 अक्षरे वाचता येऊ शकतील.
‘डिलिट फॉर एव्हरिवन’ फीचर...व्हॉट्सअॅपच्या ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ या नव्या फीचरची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते. हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएसमध्ये देण्यात आले आहे. या फीचरमध्ये चुकून पाठवलेले मेसेज काही मिनिटांच्या आत युजर्सना रिकॉल करता येतो. तुम्ही पाठविलेला मेसेज जर डिलिट करायचा असेल तर त्या मेसेजवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तेथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील. जर तुम्ही पहिला पर्याय निवडला तर तो मेसेज फक्त तुमच्या फोनमधून म्हणजेच तुमच्या पुरता डिलिट होईल. कॅन्सल निवडले तर मेसेज डिलिट होणार नाही. पण जर डिलिट फॉर एव्हरिवन हा पर्याय निवडला तर तो मेसेज तुमच्या तसेच रिसिव्हरच्या चॅट बॉक्समधून डिलिट होईल.