शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

घराच्या सफाईसाठी कंबर वाकवण्याची गरज नाही; अंधारात घर क्लीन करणाऱ्या Xiaomi च्या रोबोटची एंट्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 4:15 PM

शाओमीनं दोन रोबोट व्हॅक्युम क्लिनर लाँच केले आहेत, Roborock T8 Plus आणि Roborock T8 Plus Smart Dust Collection बाजारात आले आहेत.  

Xiaomi च्या इकोलॉजिकल चेन पार्टनर Roborock नं नवीन रोबोट व्हॅक्युम क्लिनर सादर केला आहे. याआधी सादर केलेल्या Roborock T8 रोबोटचा अपग्रेडेड व्हर्जन Roborock T8 Plus सादर करण्यात आला आहे. यावेळी कंपनीनं सक्शन पावरमध्ये वाढ केली आहे. या रोबोटचे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत, ज्यांचा उपयोग वेगवेगळा आहे. सध्या चीनमध्ये आलेला हा रोबोट लवकरच भारतात देखील येऊ शकतो.  

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  

Roborock T8 Plus मध्ये एक मोठी 2.5L डस्ट बॅग मिळते जी 60 दिवस धूळ गोळा करू शकते. Roborock T8 Plus मध्ये सॉनिक व्हायब्रेशन आणि कंस्टेंट ह्यूमिडिटी मॉपिंग देण्यात आली आहे. व्हॅक्युमक्लीनर मध्ये एक फ्लॅट व्हायब्रेटिंग मॉप देण्यात आला आहे ज्यात अँटीबॅक्टीरियल मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. 

Roborock T8 Plus मध्ये 5100Pa पेक्षा जास्त सक्शन पावर देण्यात आली आहे. यात मेन ब्रश आणि अ‍ॅडजस्टेबल स्पीड साईड ब्रश देण्यात आला आहे जो जमिनीवरून सहज धूळ, फ्लोर गॅप डस्ट, कारपेट डस्ट इत्यादींची सफाई करतो. Roborock T8 Plus मध्ये टीपीयू सॉफ्ट रबर मटेरियल ऑम्निडायरेक्शनल फ्लोटिंग ग्लू ब्रशचा वापर करण्यात आला आहे. 

यातील 3000 RPM स्पीडवर चालणारी हाय फ्रीक्वेंसी मोटार जमिनीवरील धूळ साफ करण्यासाठी डिजाईन करण्यात आली आहे. रोबोट क्लीनरमध्ये लाईट अ‍ॅक्टिव्ह रेंजिंग आणि अडथळे टाळून काम करणारी सिस्टम देण्यात आली आहे. हा रोबोट मिलीमीटर-लेव्हल 3D स्ट्रक्चर्ड लाईट रेंज पर्यंत जातो. इंफ्रारेड लाईटच्या मदतीने रोबोट अडथळ्यांचा अंदाज घेतो आणि अंधारातून देखील घर साफ करू शकतो.  

किंमत 

Roborock T8 Plus सीरीजमध्ये Roborock T8 Plus आणि Roborock T8 Plus Smart Dust Collection असे दोन व्हेरिएंट उतरवण्यात आले आहेत. Roborock T8 Plus ची किंमत 2,799 युआन (जवळपास 32,245 रुपये) आहे आणि Roborock T8 Plus Smart Dust Collection रोबोट व्हॅक्युम क्लिनर तुम्ही 3,598 युआन (जवळपास 41,450 रुपये) मध्ये विकत घेऊ शकाल. 

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान