घराची साफसफाई हे एक थकवणारं काम आहे. परंतु हेच काम तुम्ही न करता रोबोटनं केलं तर? Robovac G20 Hybrid Robot Cleaner भारतात लाँच झाला आहे. या रोबोटला तुम्ही फक्त आदेश दिला की तो संपूर्ण घराचा फक्त कचरा काढत नाही तर फरशी देखील पुसू शकतो. चला जाणून घेऊया Anker च्या Eufy Robotic Vacuum Cleaner, RoboVac G20 Hybrid ची संपूर्ण माहिती.
असं करेल काम
Anker च्या Eufy नं एक ब्रँड न्यू रोबाटिक व्हॅक्युम क्लीनर भारतात लाँच केला आहे. RoboVac G20 Hybrid मध्ये ‘2-इन-1 स्वीप अँड मॉप’ फीचर देण्यात आलं आहे. ज्याच्या मदतीनं घरात झाडू मारली जाईल, तसेच फरशी देखील पुसली जाईल. हा रोबाटिक व्हॅक्युम क्लीनर 2500pa च्या सक्शन पावर, चार सक्शन मोड, दंडार एयरफ्लो आणि डायनॅमिक नेव्हिगेशन क्षमतेसह बाजारात आला आहे.
हा रोबोट काम करत असताना फक्त 55dB इतका आवाज करतो. यातील अल्ट्रा-पॅक डस्ट कम्प्रेशन टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हा सोबत असलेल्या डस्ट बॉक्सचा चांगला वापर करतो. रोबोट स्वतःहून कुठे जास्त व्हॅक्युमिंग पावरची गरज आहे ते ओळखतो.
RoboVac G20 Hybrid मधील AI Map 2.0 टेक्नॉलॉजी क्लीनिंग एरिया शोधण्यास मदत करते. गुगल असिस्टंट आणि अलेक्सा इत्यादी व्हॉइस असिस्टंट या रॉबटला कनेक्ट करता येतात. त्यामुळे तुम्ही आवाजानं देखील या रोबोटला कामाला लावू शकता. तसेच यातील शेड्यूलिंग फिचरमुळे घर बंद असल्यावर देखील घराची साफसफाई नियमित केली जाऊ शकते.
Robovac G20 Hybrid Robot Cleaner ची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा रोबोट तुम्ही ऑनलाईन ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्ससहा ऑफलाईन रिटेल स्टोर्समधून देखील विकत घेऊ शकता.