Facebook ची पॅरेंट कंपनी Meta चा मोठा निर्णय; रशियन सरकारी मीडियाला करणार ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 08:56 AM2022-03-01T08:56:41+5:302022-03-01T08:57:31+5:30
Meta शिवाय YouTube आणि Google ची पॅरेंट कंपनी Alphabet Inc नेही रशियन सरकारी मीडिया विरोधात पावले उचलली आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. यातच Facebook ची पॅरेंट कंपनी असलेल्या Metaने मोठा निर्णय घेतला आहे. मेटा रशियन मीडिया RT आणि Sputnik ला युरोपीय युनियनमध्ये ब्लॉक करत आहे. यासंदर्भात, कंपनीचे ग्लोबल अफेयर हेड Nick Clegg यांनी भारतीय वेळेनुसार मंगळवारी दिली.
Meta आपल्या सर्व प्लॅटफॉर्मवर रशियन सरकारी मीडिया आउटलेट RT आणि Sputnik ब्लॉक करणार आहे. यासंदर्भात कंपनीला युरोपीय यूनियन आणि अनेक सरकारांकडून रिक्वेस्ट आली आहे, असे ट्विट Nick Clegg यांनी केले आहे.
युरोपात होतेय मागणी -
युरोपातील अनेक सरकारांनी, रशियन सरकारी मीडिया प्लॅटफॉर्म्ससंदर्भात पावले उचलण्यात यावित, अशी विनंती Meta कडे केली आहे. Clegg म्हणाले, Meta या समस्येवर सातत्याने सरकारांसोबत काम करत आहे. तत्पूर्वी, युरोपीय युनियनने रविवारी रशियन सरकारी मीडिया नेटवर्क RT आणि Sputnik बॅन करण्यासंदर्भात भाष्य केले होते.
We have received requests from a number of Governments and the EU to take further steps in relation to Russian state controlled media. Given the exceptional nature of the current situation, we will be restricting access to RT and Sputnik across the EU at this time.
— Nick Clegg (@nickclegg) February 28, 2022
Google नेही घातले आहेत निर्बंध -
कॅनडामध्येही टेलीकॉम ऑपरेटर्सनी RT चॅनल्सवर बंदी घातली आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धात, टेक कंपन्यांसाठी रशियन मीडिया कव्हरेज एक मोठी समस्या होऊन बसली आहे. या हल्ल्याला रशिया 'स्पेशल ऑपरेशन' म्हणत आहे. Meta शिवाय YouTube आणि Google ची पॅरेंट कंपनी Alphabet Inc नेही रशियन सरकारी मीडिया विरोधात पावले उचलली आहेत.