'जोवर गन प्वाइंट...', रशियन न्यूज चॅनल्स Starlink वर ब्लॉक करण्यास Elon Musk यांचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 04:12 PM2022-03-05T16:12:55+5:302022-03-05T16:13:42+5:30
यापूर्वी फेसबुकची पॅरेंट कंपनी Meta ने Instagram आणि Facebook या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर रूशीयन न्यूज आउटलेट्स RT आणि Sputnik ला ब्लॉक केले आहे.
प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असे SpaceX आणि Tesla चे प्रमुख Elon Musk यांचे म्हणणे आहे. यामुळे त्यांनी रशियन न्यूज सोर्सना Starlink सॅटेलाईट ब्रॉडबँड सर्व्हिसवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली.
Elon Musk यांनी ट्विट करत सांगितले की, काही सरकारांकडून Starlink सॅटेलाइट ब्रॉडबँड सर्व्हिसला रशियन न्यूज सोर्स बॅन करण्या यावे, असे सांगण्यात आले आहे. मात्र, अशी विनंती युक्रेनकडून करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या बंदी घालण्यासंदर्भातील विनंतीवर बोलताना ते म्हणाले, जोवर हे गन प्वाइंटवर होत नाही, तोवर आपण असे करणार नाही. एवढेच नाही तर, भाषण स्वातंत्र्याच्या बाजूने असल्याने क्षमस्व, असेही मस्क यांनी म्हटले आहे.
Starlink has been told by some governments (not Ukraine) to block Russian news sources. We will not do so unless at gunpoint.
— Elon Musk (@elonmusk) March 5, 2022
Sorry to be a free speech absolutist.
Meta ने रशियन चैनल्स बॅन केले आहेत -
यापूर्वी फेसबुकची पॅरेंट कंपनी Meta ने Instagram आणि Facebook या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर रूशीयन न्यूज आउटलेट्स RT आणि Sputnik ला ब्लॉक केले आहे.
YouTube ने कमाई रोखली -
The Verge च्या एका वृत्तानुसार, यूट्यूबने म्हटले आहे की, युरोपातील देशांकडून यासंदर्भात रिक्वेस्ट मिळाली होती. गुगलनेही यावर मोठी अॅक्शन घेतली आहे. YouTube वरून होत असलेली चॅनल्सची कमाई थांबवण्यात आली आहे.