रशियातील टेक उद्योजक आपलं फोटो शेयरिंग अॅप घेऊन येणार आहेत. हा निर्णय रशियात इंस्टाग्राम बॅन झाल्यावर घेण्यात आला आहे. येत्या 28 मार्चला फोटो शेयरिंग अॅप Rossgram रशियात सादर होईल. याची माहिती कंपनीनं आपल्या वेबसाईटवरून दिली आहे.
रशियन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म VKontakte वर Alexander Zobov यांनी सांगितलं, “माझे सहकारी Kirill Filimonov आणि आमचा डेव्हलपर्सचा ग्रुप आधीपासूनच या इव्हेंटसाठी तयार होता आणि आम्ही रशियन सोशल मीडिया आणण्याची ही संधी सोडू इच्छित नाही.”
Vkontakte वर शेयर करण्यात आलेल्या फोटोजमध्ये Rossgram चे रंग आणि लेआउट मोठ्याप्रमाणावर Instagram सारखी दिसत आहे. यात अॅपमध्ये क्राउडफंडिंग आणि पेड कंटेंट अॅक्सेस, असे फीचर्स देखील देण्यात येतील. रशिया गेल्या काही वर्षांपासून टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रशियन स्मार्टफोन AYYA T1 ची माहिती आली होती.
इंस्टाग्राम आणि फेसबुक बॅन
रशियात Instagram आणि फेसबुक दोन्ही अॅप बॅन करण्यात आले आहेत. हा निर्णय फेसबुकच्या पॅरेंट कंपनीनं युक्रेनमधील युजर्ससाठी कंपनीनं आपल्या कंटेंट मॉडरेशन पॉलिसीमध्ये केलेल्या बदलांमुळे घेण्यात आला आहे. मेटानं युक्रेनियन लोकांना रशियाच्या विरोधात पोस्ट करण्याची सूट दिली आहे. त्यामुळे रशियानं Meta विरोधात तपास देखील सुरु केला आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे टेक्नॉलॉजी कंपन्यांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. Meta सोबत Google आणि Apple नं रशियाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. या प्लॅटफॉर्म्सवरून रशियाचे सरकारी मीडिया चॅनेल्स बॅन करण्यात आले आहेत.