सॅमसंगस्मार्टफोनची एक यादी इंटरनेटवर चुकून लीक झाली आहे. या यादीत कंपनीच्या त्या स्मार्टफोन्सची नावे आहेत ज्यांना Android 12 अपडेट मिळणार आहे. फक्त नावे नाहीत तर कोणत्या स्मार्टफोनला कधी अपडेट मिळणार आहे हे देखील या यादीत सांगण्यात आले आहे. हा अपडेट अँड्रॉइड 12 वर बेस्ड वन युआय 4 चा असेल. Android 12 आधारित वन युआय 4 अपडेटचे हे शेड्युल दक्षिण कोरियन युजर्ससाठी आहे. त्यानंतर हा अपडेट भारतासह जगभरातील सॅमसंग स्मार्टफोन्सवर उपलब्ध होईल.
कंपनीने सॅमसंग मेंबर कोरियन फोरमवर वन युआय 4 च्या स्टेबल अपडेटची लाँच टाइमलाईनचा खुलासा केला आहे. ही चुकून केलेली पोस्ट होती, त्यामुळे कंपनीने ही पोस्ट डिलीट केली. परंतु त्याआधीच टिपस्टर @FrontTron ने स्क्रिनशॉट शेयर केला आहे.
Android 12 Update for Samsung Update Timeline:
नोव्हेंबर 2021:
Galaxy S21 Ultra, S21+, S21
डिसेंबर 2021:
Galaxy Z Fold3 5G, Z Flip3 5G, Ultra, Note 20 Ultra, Note20, Z Fold2, Z Flip 5G
जानेवारी 2022:
Galaxy Fold 5G, Z Flip, Note 10/10+, S20 FE, S10 5G, S10+/S10/S10e, A52s 5G, A42 5G, Quantum2
फेब्रुवारी 2022:
Galaxy Tab S7/S7+
एप्रिल 2022:
Galaxy A51 5G, Tab S7 FE/ S7 FE 5G, A90 5G, Tab S6/S6 5G, Jump, A Quantum
मे 2022:
Galaxy Tab S6 Lite, Tab Active3, A32, A31, A12, Buddy, Wide5, Tab A7(2020)
जून 2022:
Galaxy Tab A7 Lite
जुलै 2022:
Galaxy A21s, Xcover5, M12