Samsung ने आपला भारतातील 5G स्मार्टफोनचा पोर्टफोलिओ वाढवला आहे. गेल्या महिन्यात ‘ए’ सीरीज अंतगर्त Samsung Galaxy A22 4G स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता, आज या स्मार्टफोनचा 5G व्हर्जन Samsung Galaxy A22 5G नावाने लाँच करण्यात आला आहे. हा फोन सॅमसंगचा भारतातातील सर्वात स्वस्त 5G Phone आहे. (Samsung Galaxy A22 5G launched in India at Rs 19999)
Samsung Galaxy A22 5G ची किंमत
Samsung Galaxy A22 5G हा स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटसह रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल.
Samsung Galaxy A22 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A22 5G मध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. फोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित वनयुआय 3.1 मिळतो. कंपनीने या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 चिपसेट दिला आहे. या फोनमध्ये 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबीपर्यंतची स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A22 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए22 5जी फोन 5,000एमएएच बॅटरी आणि 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे.