Samsung भारतात आपला नवीन प्रोजेक्टर सादर केला आहे. जो तुम्हाला घरच्या घरी थिएटरचा अनुभव देईल. तुम्ही सोयीनुसार याच्या प्रोजेक्शनचा आकार कमी जास्त करू शकता. या प्रोजेक्टरनं Samsung Freestyle Portable Projector या नावानं पदार्पण केलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हा प्रोजेक्टर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला होता. आता सॅमसंगनं याची विक्री सुरु केली आहे.
Samsung Freestyle Portable Projector चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Samsung Freestyle Portable Projector सर्वप्रथम CES 2022 मधून जगासमोर ठेवण्यात आला होता. हा फक्त प्रोजेक्टर नाही तर याचा वापर स्मार्ट स्पिकर किंवा अॅम्बिएंट लाईटनिंग डिवाइस म्हणून देखील करता येईल. छोट्याश्या आकार आणि कमी वजनामुळे हा प्रोजेक्टर कुठेही नेता येतो आणि कधीही 30 ते 100 इंचाचा प्रोजेक्शन मिळवता येतं. जमीन, भिंत, किंवा छतावर देखील प्रोजेक्शन करता येईल, कारण यात भिंतीच्या रंगानुसार प्रोजेक्शन ऑप्टिमाईज करण्याची क्षमता आहे.
यातील क्राडेल डिजाइन आणि 180 डिग्री रोटेशनच्या मदतीनं व्यूइंग अँगल सहज अडजस्ट करता येतो. चांगल्या पिक्चर क्वालिटीसाठी यात ऑटो कीस्टोन, ऑटो लेव्हलिंग आणि ऑटोफोकस फीचर्स देण्यात आले आहेत. यात ओमनीडायरेक्शनल 360 डिग्री साउंड देणारे स्पीकर आहेत. अर्धपारदर्शक लेन्स कॅपमुळे या डिवाइसचं रूपांतरण प्रिज्म लाईटिंग इफेक्टसह अॅम्बिएंट लाईट डिवाइसमध्ये करता येतं.
यात बिक्सबी आणि अॅलेक्सा वॉयस असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच एयरप्ले 2, मायक्रो एचडीएमआय पोर्ट, 1920x1080p नेटिव्ह रेजोल्यूशन आणि एचडीआर 10 सपोर्ट मिळतो. या डिवाइसमध्ये नेटफ्लिक्स, हुलु आणि इतर ओटीटी अॅप्स तर वापरता येतात परंतु तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन देखील यावर मिरर करू शकता. Samsung Freestyle Portable Projector सोबत वॉटरप्रूफ आणि स्क्रॅच फ्री केस देखील मिळतो.
किंमत
अॅमेझॉन आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरून Samsung Freestyle Portable Projector विकत घेता येईल. याची किंमत 84,990 रुपये ठेवण्यात आली आहे.