Galaxy A Event 2022: Samsung नं आपल्या 17 मार्चच्या इव्हेंटची माहिती दिली आहे. या इव्हेंटमधून Galaxy A सीरीजचे स्मार्टफोन्स सादर केले जातील, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. नेमके कोणते मॉडेल्स ग्राहकांच्या भेटीला येतील हे मात्र समजलं नाही. Samsung Awesome Galaxy A इव्हेंटच्या ऑनलाईन लीक झालेल्या माहितीनुसार कंपनी Samsung Galaxy A53 5G आणि Galaxy A73 5G लाँच करू शकते.
येत्या 17 मार्च 2022 ला Samsung Galaxy A इव्हेंटचं आयोजन करण्यात येईल. भारतीय वेळेनुसार हा इव्हेंट संध्यकाळी 7.30 वाजता सुरु होईल. याचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या YouTube चॅनेल आणि Samsung Newsroom वर बघता येईल.
Samsung Galaxy A53 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A53 स्मार्टफोन 6.46 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह लाँच केला जाईल. हा पंच-होल डिजाइनसह येणारा पॅनल 1080 × 2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित वनयुआय 4.0 वर चालेल. यात कंपनीचा एक्सनॉस 1200 चिपसेट देण्यात येईल. सोबत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचे दोन सेन्सर मिळतील. या आगामी सॅमसंग फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात येईल जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
हा फोन White आणि Blue कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये Samsung Pay, IP67 रेटिंग आणि Dolby Atmos सपोर्ट मिळू शकतो. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G SA / NSA, Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5, GPS + GLONASS, USB Type-C, आणि NFC मिळू शकते.
Samsung Galaxy A73 चे स्पेसिफिकेशन
OnLeaks आणि Zoutons नं आगामी Samsung Galaxy A73 स्मार्टफोनचे डिजाइन रेंडर शेयर केले आहेत. त्यानुसार हा फोन एज टू एज डिस्प्ले आणि पंच होल कटआउटसह सादर केला जाईल. ज्यात 6.7-इंचाच अॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये Snapdragon 750G चिपसेट देण्यात येईल. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह सादर केला जाईल. या फोनच्या मागे असलेल्या आयताकृती कॅमेरा मॉड्यूलमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सोबत 32MP सेल्फी कॅमेरा मिळेल. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकते.
हे देखील वाचा: