दक्षिण कोरियन कंपनी Samsung भारतात चिनी स्मार्टफोन्सना टक्कर देत आहे. आता बजेट सेगमेंटमध्ये देखील सॅमसंगकडून शाओमी-रियलमीला चांगली टक्कर मिळणार असल्याचं दिसत आहे. लवकरच Galaxy A-Series Samsung Galaxy A03 स्मार्टफोनची एंट्री होणार आहे. 91mobiles च्या रिपोर्टनुसार, 11 हजारांपेक्षा कमी किंमतीत लवकरच Samsung Galaxy A03 के भारतीय बाजारात येणार आहे.
Samsung Galaxy A03 Price In India
सॅमसंग गॅलेक्सी ए03 चे दोन रॅम व दोन स्टोेरेज व्हेरिएंट भारतात येतील. यातील 3GB रॅम व 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,499 रुपये असेल. तर 4GB रॅम व 64GB स्टोरेजसाठी 11,999 रुपये मोजावे लागतील. कंपनीनं मात्र अजूनही याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे लाँच डेट देखील समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाल्यामुळे या फोनच्या स्पेक्स समजले आहेत.
Samsung Galaxy A03 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच का HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिजाईन असलेला डिस्प्ले आहे. या फोनला ऑक्टा कोर प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. फोनमधील चिपसेटची माहिती मात्र मिळाली नाही. Galaxy A03 चे दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. ज्यात 3GB/32GB आणि 4GB/64GB चा समावेश आहे.
Samsung Galaxy A03 च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2MP ची डेप्थ ऑफ फील्ड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या सॅमसंगच्या फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
- यापेक्षा स्वस्तात iPhone 13 पुन्हा मिळणार नाही; आताच घ्या Flipkart च्या जबरदस्त ऑफरचा फायदा
- भन्नाट! रात्रीच्या अंधारात देखील क्लियर फोटो घेणारा मोबाईल; येतोय दोन स्क्रीन असलेला 'हटके' Smartphone