Samsung New Phone 2021: Samsung नं कोणताही गाजावाजा न करता आपला नवीन Budget Phone सादर केला आहे. आता आलेला Samsung Galaxy A03 स्मार्टफोन जुन्या Galaxy A02 ची जागा घेईल. या नव्या स्वस्त स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh ची दमदार बॅटरी, 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 4GB RAM देण्यात आला आहे.
Samsung Galaxy A03 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच का HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिजाईन असलेला डिस्प्ले आहे. या फोनला ऑक्टा कोर प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. फोनमधील चिपसेटची माहिती मात्र मिळाली नाही. Galaxy A03 चे तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. ज्यात 3GB/32GB, 4GB/64GB आणि 4GB/128GB चा समावेश आहे.
Samsung Galaxy A03 च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2MP ची डेप्थ ऑफ फील्ड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या सॅमसंगच्या फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy A03 ची किंमत
Samsung नं फक्त नव्या बजेट स्मार्टफोन Galaxy A03 ची घोषणा केली आहे. कंपनीनं या स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती दिली नाही. लवकरच हा फोन ब्लॅक, रेड आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल, अशी अपेक्षा आहे.