Samsung आपले बजेट फ्रेंडली स्मार्टफोन A-सीरीजमध्ये सादर करते. आता या सीरिजमध्ये एक स्मार्टफोन वाय-फाय अलायंसच्या वेबसाईटवर एसएम-ए045एफ/डीएस कोडसह लिस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच हा हँडसेट बाजारात येणार हे स्पष्ट झालं आहे. या लिस्टिंगमधून या डिवाइसच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.
वाय-फाय एलायंस डेटाबेसनुसार हा आगामी स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए04 नावानं ग्राहकांच्या भेटीला येईल. तसेच या फोनच्या ओएस, मॉडेल नंबर आणि वाय-फायची माहिती देखील मिळाली आहे. फोनच्या लीक रेंडर्स नुसार, यात उजवीकडे वॉल्यूम बटन आणि इंटीग्रेटेड पावर बटन मिळेल.
Samsung Galaxy A04 चे फीचर्स
लिस्टिंगनुसार डिवाइस ड्युअल-बँड वाय-फाय (2.4GHz आणि 5GHz) ला सपोर्ट करेल. वाय-फाय एसी/एन/ए/बी/जी कनेक्टिव्हिटी ऑप्शन म्हणून मिळतील. मॉडेल नंबरमधील डीएसचा अर्थ असा की हा एक ड्युअल सिम फोन असेल. हा फोन अँड्रॉइड 12 ओएस वर आधारित सॅमसंगच्या वनयूआय 4 वर चालेल. फोन जुन्या सॅमसंग गॅलेक्सी ए03 ची जागा घेईल, जो दहा हजारांच्या बजेटमध्ये आला आहे.
Samsung Galaxy A03 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच का HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिजाईन असलेला डिस्प्ले आहे. या फोनला ऑक्टा कोर प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. फोनमधील चिपसेटची माहिती मात्र मिळाली नाही. Galaxy A03 चे दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. ज्यात 3GB/32GB आणि 4GB/64GB चा समावेश आहे. ही स्टोरेज 1TB पर्यंत मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल.
Samsung Galaxy A03 च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2MP ची डेप्थ ऑफ फील्ड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या सॅमसंगच्या फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.