टेक दिग्गज सॅमसंगने चिपसेट बदलून Galaxy A12 स्मार्टफोन युरोपियन बाजारात लाँच केला आहे. या नवीन व्हर्जनला कंपनीने Galaxy A12 Nacho असे नाव दिले आहे. हा फोन लो बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. चिपसेटव्यतिरिक्त या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. (Samsung Galaxy A12 launched in Russia with Exynos 850 chipset)
Samsung Galaxy A12 Nacho चे स्पेसिफिकेशन्स
Galaxy A12 मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा एचडी+ टीएफटी डिस्प्ले दिला आहे. हा ‘व्ही’ नॉच असलेला डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशयोसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 850 चिपसेटसह युरोपियन बाजारात सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 512जीबी पर्यंत एक्सपांडेबल आहे.
Galaxy A12 Nocho स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A12 मध्ये पावर बॅकअपसाठी 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत
सॅमसंग गॅलेक्सी ए12 नाचोचा 4GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल रशियात RUB 11,990 (जवळपास 12,000 रुपये) मध्ये उपलब्ध झाला आहे आणि 4GB रॅम व 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत RUB 13,990 (14,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.