Samsung नं आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीजमध्ये काही स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केले आहेत. एक-एक करून या स्मार्टफोनची भारतात एंट्री होत आहे. आता स्वस्त Samsung Galaxy A13 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्च सुरु आहे. सध्या युरोपियन बाजारात उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोनची भारतीय किंमत समोर आली आहे.
Samsung Galaxy A13 India price
टेक वेबसाईट प्राईस बाबाच्या रिपोर्टनुसार, Galaxy A13 स्मार्टफोनच्या 4GB RAM व 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 14,999 रुपये असेल. तर 4GB RAM व 128GB स्टोरेज मॉडेल 15,999 आणि 6GB RAM व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17,499 रुपयांच्या आसपास असेल. Samsung Galaxy A13 ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल, असं देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
Samsung Galaxy A13 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी ए13 मध्ये कंपनीनं 6.6-इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यातील सॅमसंग वन युआय 4.1 अँड्रॉइड 12 आधारित आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये एक्सनॉस 850 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यांतची इंटरनल स्टोरेज मिळते.
Samsung Galaxy A13 च्या बॅक पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. हा डिवाइस बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A13 मधील 5,000एमएएचची बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे.