सॅमसंग एक स्वस्त 5G Phone लाँच करण्याची तयारी करत आहे हा फोन Galaxy A13 5G नावाने सादर केला जाईल. हा फोन बाजारात कधी उतरेल हे अजून समजले नाही परंतु या फोनची माहिती मात्र लीक होत आहे. आता टिपस्टर OnLeaks आणि Zouton ने Galaxy A13 5G स्मार्टफोनचे रेंडर शेयर केले आहेत. तसेच या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील लीक झाले आहेत.
Samsung Galaxy A13 5G चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.48-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी पॅनल दिला जाऊ शकतो. हा फोन पातळ बेजल आणि प्लास्टिक बॅक पॅनलसह सादर केला जाईल. या डिवाइसमध्ये MediaTek Dimensity 700 SoC मिळू शकते. त्याचबरोबर 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळेल. Galaxy A13 5G स्मार्टफोन Android 11 वर आधारित कंपनीच्या कस्टम युजर इंटरफेस OneUI 3.1 वर चालेल.
Samsung Galaxy A13 5G च्या लीक रेंडरनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला जाईल. यात 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. यात वॉटर ड्रॉप नॉचसह फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. या फोनमधील बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह सादर केली जाऊ शकते.
Samsung Galaxy A13 5G ची संभाव्य किंमत
Samsung Galaxy A13 5G स्मार्टफोन एकापेक्षा जास्त व्हेरिएंटसह सादर केला जाऊ शकतो. हा फोन 250 डॉलर (सुमारे 19,000 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. हा सॅमसंग फोन ब्लॅक, रेड, ब्लू, व्हाइट कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.