Samsung Galaxy A13 5G लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G Phone असेल असा दावा मीडिया रिपोर्ट्समधून केला जात आहे. गेले कित्येक दिवस रिपोर्ट्स आणि लिस्टिंगमधून Galaxy A13 5G च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. आज हा फोन ब्लूटूथ SIG वर लिस्ट करण्यात आला आहे, त्यामुळे या डिवाइसचा लाँच नजीक असल्याचा अंदाज लावला जात आहे.
ब्लूटूथ एसआयजीवर हा SM-A136U, SM-A136U1, SM-A136W आणि SM-S136DL या मॉडेल नंबरसह आया लिस्ट झाला आहे. हे वेगवेगळ्या देशांमध्ये लाँच होणारे मॉडेल नंबर आहेत. या सर्टिफिकेशन साईटवरून Galaxy A13 5G च्या मॉडेल नंबर व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.
Samsung Galaxy A13 5G Phone चे लीक स्पेक्स
लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए13 5जी फोनमध्ये 6.48 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळेल. हा एक एलसीडी पॅनल असेल जो वॉटरड्रॉप नॉच स्क्रीनसह बाजारात येईल. फोनमध्ये अँड्रॉइड ओएसवर आधारित सॅमसंग वनयुआय मिळेल. तसेच या फोनला मीडियाटेकचा डिमेनसिटी 700 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात येईल. यात 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेजला मिळेल.
फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए13 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र समोर आली नाही. बेसिक कनेक्टिव्हिटीसह या डिवाइसमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. तर या मोबाईलमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल.
Samsung Galaxy A13 5G ची संभाव्य किंमत
Samsung Galaxy A13 5G चे तीन रॅम आणि दोन स्टोरेज व्हेरिएंट बाजारात उपलब्ध होऊ शकतात. या फोनची किंमत 249 डॉलर म्हणजे 18,500 भारतीय रुपयांच्या आसपास सुरु होईल.