Samsung Budget 5G Phone: Samsung नं काही दिवसांपूर्वी आपल्या नवीन आणि स्वस्त 5G Phone ची घोषणा केली होती. आता हा फोन अधिकृतपणे अमेरिकेत सादर करण्यात आला आहे. कंपनीनं Samsung Galaxy A13 5G जागतिक बाजारात सादर केला आहे. या फोनची निर्मिती भारतात देखील सुरु करण्यात आली आहे, त्यामुळे लवकरच हा फोन भारतीय बाजारात देखील दिसू शकतो.
Samsung Galaxy A13 5G चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी ए13 5जी मध्ये कंपनीनं 6.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यातील सॅमसंग वन युआय अँड्रॉइड 11 आधारित आहे. प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
Samsung Galaxy A13 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. या फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. हा डिवाइस बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A13 5G मधील 5,000एमएएचची बॅटरी 15वॉट फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे.
Samsung Galaxy A13 5G ची किंमत
Samsung Galaxy A13 5G च्या एकमेव 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 249.99 अमेरिकन डॉलर ठेवण्यात आली आहे. ही किंमत 18,500 भारतीय रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. हा अमेरिकेतील सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5जी फोन आहे. हा फोन जागतिक बाजारात कधी येईल हे मात्र कंपनीनं सांगितलं नाही.