Samsung ने आज भारतीय बाजारात गॅलेक्सी ए सीरीजमध्ये Samsung Galaxy A13 आणि Samsung Galaxy A23 हे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. या लेखात आपण बजेट रेंजमध्ये आलेल्या ए13 ची माहिती घेणार आहोत. जो 50MP camera, 5,000mAh battery आणि 6GB रॅमसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे. चला जाणून घेऊया सॅमसंग गॅलेक्सी ए13 स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
Samsung Galaxy A13 ची किंमत
सॅमसंग गॅलेक्सी ए13 स्मार्टफोनच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रुपये आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेल 17,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन ब्लू, ब्लॅक, व्हाईट आणि ऑरेंज रंगात विकत घेता येईल.
Samsung Galaxy A13 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी ए13 मध्ये कंपनीनं 6.6-इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं याला कॉर्निग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. यातील सॅमसंग वन युआय 4.1 अँड्रॉइड 12 आधारित आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये एक्सनॉस 850 चिपसेट आणि माली जी52 जीपीयू देण्यात आला आहे. त्याचबरोबर 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यांतची इंटरनल स्टोरेज मिळते.
Samsung Galaxy A13 च्या बॅक पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. हा डिवाइस बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स, साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. Samsung Galaxy A13 मधील 5,000एमएएचची बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आली आहे.