Samsung ने Galaxy A22 5G आणि Galaxy A22 4G अधिकृतपणे लाँच केले आहेत. या फोन्सबाबत कित्येक दिवसांपासून बातम्या येत होत्या. गॅलेक्सी ए-सीरीजमधील या फोनच्या 4G आणि 5G व्हेरिएंटचा लुक आणि फीचर्स जवळपास एकसारखे आहेत. परंतु, काही स्पेसिफिकेशनमध्ये वेगळेपणा दिसून येतो.
Samsung Galaxy A22 4G चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी ए22 4G व्हेरिएंटबाबत बोलायचे तर, यात 6.4-इंचाचा AMOLED HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. या व्हेरिएंटमध्ये MediaTek Helio G80 SoC सह 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेजचे ऑप्शन देण्यात आले आहेत.
फोटोग्राफीसाठी फोनमधील क्वाड कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेंसर, दोन 2-मेगापिक्सलचे डेप्थ आणि मॅक्रो सेंसर आहेत. फोनमधील सेल्फी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा डिवाइस Violet, Mint, Black आणि White मध्ये रंगात उपलब्ध होईल. या अँड्रॉइड 11 आधारित फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy A22 5G चे स्पेसिफिकेशन्स
या डिवाइसचा 5G व्हेरिएंट 6.6-इंचाच्या Full HD+ IPS एलसीडी डिस्प्लेसह येतो. फोन MediaTek Dimensity 700 5G SoC ने सुसज्ज आहे. Samsung Galaxy A22 5G मध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज, 4GB रॅम +128GB स्टोरेज, 6GB रॅम+128GB स्टोरेज आणि 8GB रॅम +128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेंसर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहेत. फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे.
Samsung Galaxy A22 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट फास्ट चार्जिंगसह येते. डिवाइस अँड्रॉइड 11 बेस्ड वन युआय 3.0 वर चालतो.
Samsung Galaxy A22 5G आणि Galaxy A22 4G ची प्राइस
अजूनतरी Samsung Galaxy A22 5G आणि Galaxy A22 4G च्या किंमतीची माहिती कंपनीने सांगितली नाही. परंतु, अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार गॅलेक्सी A22 5G ची किंमत €185 (जवळपास 16,487 रुपये) असेल जी फोनच्या 64GB व्हेरिएंटची किंमत असू शकते. हि बातमी खरी ठरल्यास हा फोन सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G फोन असेल.