वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेसमुळे स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉप्सची मागणी वाढत आहे. परंतु अश्यावेळी स्मार्टफोन निर्माता कंपन्या आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शाओमी, रियलमी आणि ओपोने आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली होती. आता दक्षिण कोरियन टेक दिग्गज Samsung ने आपल्या लोकप्रिय Galaxy A52 4G स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. सॅमसंगने Galaxy A52 4G स्मार्टफोनची किंमत 1,000 रुपयांनी वाढवली आहे. चला जाणून घेऊया अपडेटेड किंमत.
Samsung Galaxy A52 4G ची नवीन किंमत
Samsung Galaxy A52 4G स्मार्टफोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. या फोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला छोटा व्हेरिएंट भारतात 26,499 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. परंतु आता 1,000 रुपयांच्या दरवाढीनंतर हा फोन 27,499 रुपयांमध्ये कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 27,999 रुपयांमध्ये लाँच झालेला 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला मॉडेल आता 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Samsung Galaxy A52 4G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A52 4G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Snapdragon 720G SoC आणि Adreno 618 जीपीयू मिळतो. हा फोन Android 11 आधारित One UI 3.1 वर चालतो. Galaxy A52 4G मध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह मिळते.
Galaxy A52 4G स्मार्टफोनमधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य सेन्सर, 12 MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर, 5MP चा डेप्थ आणि 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. Galaxy A52 4G मधील 4500mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.