Samsung ने काही महिन्यांपूर्वी Galaxy A52 स्मार्टफोन भारतात सादर केला होता. आता या स्मार्टफोनचा अपडेटेड व्हर्जन Galaxy A52s 5G च्या लाँचची तयारी कंपनी करत आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क सपोर्ट देण्यात येईल. टेक वेबसाईट Winfuture या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती आपल्या रिपोर्टमध्ये सांगितली आहे. तसेच हा फोन ऑगस्ट अखेर बाजारात येईल असे सांगितले आहे.
Samsung Galaxy A52s 5G ची किंमत
वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Galaxy A52s युरोपियन बाजारात 449 युरोमध्ये किंवा 530 डॉलर्समध्ये लाँच केला जाईल. ही किंमत 39,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन Blue, Black, Green आणि Purple रंगात विकत घेता येईल.
Samsung Galaxy A52s 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये कंपनी 6.5 इंचाचा फुल एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 778G चिपसेट, 8GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा फोन Android 11 आधारित OneUI 3.1 वर चालतो. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.
फोटोग्राफीसाठी या आगामी सॅमसंग फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात येईल. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. या फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केली जाऊ शकते.