गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर आज Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लाँच झाला आहे. गेल्या महिन्यात जागतिक बाजारात उपलब्ध झाल्यानंतर देशातील सॅमसंगचे चाहते गॅलेक्सी ए52एस 5जी फोनची आतुरतेने वाट बघत होते. हा फोन भारतात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्रोसेसर, 64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 8GB रॅम अश्या दमदार स्पेसिफिकेशन्ससह दाखल झाला आहे.
Samsung Galaxy A52s 5G ची किंमत
Samsung Galaxy A52s 5G ची प्रारंभिक किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत या स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट विकत घेता येईल. तर 8GB RAM सह 128 GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 37,499 रुपये खर्च करावे लागतील. हा फोन आजपासून ऑफलाइन आणि अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून ऑनलाईन विकला जाईल. या फोनसह HDFC बँकेच्या ग्राहकांना डेबिट, क्रेडिट आणि ईएमआय ट्रँजॅक्शनवर 3,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
Samsung Galaxy A52s 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आणि एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वनयुआय 3 वर चालतो.
सॅमसंगने आपला हा फोन ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. हा फोन IP67 रेटेड आहे, त्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. ड्युअल मोड 5G आणि इतर बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये Samsung Pay, Samsung Knox आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. हा फोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सॅमसंग फोनमधील 4,500एमएएचची बॅटरी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy A52s 5G फोनचा आकार 159.9 x 75.1 x 8.4एमएम आणि वजन 189 ग्राम आहे.