Samsung नं सप्टेंबरमध्ये आपला नवीन 5G Phone भारतात सादर केला आहे. Galaxy A52s 5G फोन आता मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. अॅमेझॉन इंडियावर हा मोबाईल 11,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. फक्त थेट डिस्काउंट नाही तर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सनंतर हा फोन खूपच स्वस्तात विकत घेता येईल
Samsung Galaxy A52s वर 5000 हजार रुपयांचा कुपन डिस्काउंट देण्यात आला आहे. तर अजून 6000 वाचवण्यासाठी तुम्हाला आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डनं पेमेंट करावं लागेल. या दोन्ही ऑफरमुळे एकूण 11 हजारांची बचत होते. तसेच जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही आणखीन 14,950 रुपये वाचवू शकता.
Samsung Galaxy A52s 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंगस्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आणि एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वनयुआय 3 वर चालतो.
सॅमसंगने आपला हा फोन ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. हा फोन IP67 रेटेड आहे, त्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. ड्युअल मोड 5G आणि इतर बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये Samsung Pay, Samsung Knox आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. हा फोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सॅमसंग फोनमधील 4,500एमएएचची बॅटरी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy A52s 5G फोनचा आकार 159.9 x 75.1 x 8.4एमएम आणि वजन 189 ग्राम आहे.
हे देखील वाचा:
Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे
फक्त 7,499 रुपयांमध्ये आला 5000mAh Battery असलेला शानदार स्मार्टफोन; Redmi ला टाकणार मागे?