शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती मध्यवर्ती कारागृहात फटाका की बॉम्ब? उडाली खळबळ
2
"...तेव्हा तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते, एकदम पांढरेफटक"; CM शिंदेंचा हल्लाबोल
3
भरधाव कार ट्रॅक्टरला धडकली, खामगावातील युवकाचा जागीच मृत्यू
4
आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री
5
कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मोरगाव भाकरे येथील जवानाला हौतात्म्य
6
एक म्हैस, दोन दावेदार...! पंचायतीला करता आला नाही न्याय निवाडा, तेव्हा खुद्द म्हशीनंच सोडवला वाद
7
कत्तलीसाठी जात असलेल्या २८ गाेवंशांना जीवनदान; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
8
अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात, शिंदेंच्या विधानानं सभागृहात एकच हशा! नेमकं काय घडलं?
9
ZIM vs IND T20I : झिम्बाब्वेची विजयी सलामी! भारताची 'युवा'सेना पराभूत; गिल-सुंदरची झुंज अयशस्वी
10
"हिंदू हिंसक असते तर...", दोन वर्षांनंतर सार्वजनिक व्यासपीठावरून नुपूर शर्मा स्पष्टच बोलल्या? बघा VIDEO
11
"भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर याद राखा"; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
12
आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; १९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार!
13
"७० दिवसानंतर खरी मॅच सुरू होईल तेव्हा जनताच खोके सरकारची कॅच घेईल’’, एकनाथ शिंदेंना नाना पटोलेंचा टोला 
14
ZIM vs IND : झिम्बाब्वेकडून भारताचा पराभव! खासदार शशी थरूर यांची BCCI वर बोचरी टीका, म्हणाले...
15
Sangli: वटवाघळामुळे आरामबसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली; चालकासह प्रवासी किरकोळ जखमी
16
राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने
17
हाय कोलेस्ट्रॉल, हार्ट अ‍ॅटॅकचं टेन्शन सोडा, या 5 गोष्टी आहारात सुरू करा; मग बघा कमाल...!
18
नशीब बलवत्तर, मोठी दुर्घटना टळली! लोखंडी अँगल कारच्या काचा फोडून शिरले आत
19
सूर्यकुमार म्हणाला,‘चेंडू हातात बसला;’ पण त्याच्या  'हाता'मागे होता एक भक्कम 'हात'! माहीत आहे कुणाचा?
20
महत्वाची अपडेट! देशाचा अर्थसंकल्प २३ जुलैला मांडला जाणार; मोदी ३.० काय काय घोषणा करणार? 

108MP कॅमेरा असलेला सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, शाओमी-रियलमीची करणार सुट्टी 

By सिद्धेश जाधव | Published: March 29, 2022 3:02 PM

Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा 108MP चा कॅमेरा असलेला कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.  

Samsung नं आपल्या Galaxy A सीरीजमधील सर्वात पहिला 108MP चा कॅमेरा असलेला फोन भारतात सादर केला आहे. Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोननं क्वालकॉमच्या Snapdragon 778G SoC सह देशात पदार्पण केलं आहे. सोबत, 120Hz रिफ्रेश रेट, 8GB रॅम, 5000mAh ची बॅटरी आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा, असे स्पेक्स देखील देण्यात आले आहेत.  

Samsung Galaxy A73 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A73 5G मध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि Corning Gorilla Glass 5 सह येतो. यात Snapdragon 778G ची प्रोसेसिंग पवार आणि Adreno 642L GPU मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज आहे. जी मायक्रो SD कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 12 बेस्ड OneUI 4.1 वर चालतो. 

Samsung Galaxy A73 च्या बॅक पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 108MP चा मुख्य सेन्सर, 12MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 5MP ची मॅक्रो लेन्स आणि 5MP चा डेप्थ सेन्सर आहे. तर फ्रंटला एक 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये इन-डिस्प्ले सेन्सर देण्यात आला आहे. पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी IP67 रेटिंग देण्यात आली आहे. हा सॅमसंग फोनमध्ये 25W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळते.  

सॅमसंगचा हा फोन ऑसम मिंट, ऑसम ग्रे आणि ऑसम व्हाइट कलर ऑप्शनमध्ये आला आहे. यातील रॅम प्लस फिचरच्या मदतीनं फोनचा 16GB पर्यंत वाढवता येतो. सॅमसंगच्या फोनसोबत तुम्हाला बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही. सॅमसंगच्या या फोनला चार वर्षापर्यंत ऑपरेटिंग सिस्टम अपडेट आणि पाच वर्ष सिक्योरिटी अपडेट देण्यात येतील. 

Samsung Galaxy A73 5G ची किंमत  

Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोनची किंमत मात्र कंपनींना गुलदस्त्यात ठेवली आहे. लवकरच हा फोन प्री बुकिंगसाठी Samsung.com, प्रमुख रिटेल स्टोर आणि ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध होईल.  

टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान